आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रंगेहाथ अटक:पोलिसांच्या सापळ्यात अडकला दुचाकीचोर, 16 दुचाकी हस्तगत

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलिसांनी सापळा रचून चाेराला दुचाकी चोरी करताना रंगेहाथ अटक केली. वावरे लेन, भद्रकाली येथे भद्रकाली पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने ही कारवाई केली. चोराकडून १६ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या. हेमंत रमेश सोनवणे (३५, रा. सटाणा) असे चोराचे नाव आहे. पाेलिस पथकातील एका कर्मचाऱ्याची दुचाकी वावरे लेन येथे विनालाॅक दुचाकी उभी केली व पथकाचे कर्मचारी साध्या वेशात पाळत ठेवत उभे राहिले. संशयित विनालाॅक दुचाकी सुरू करत असतानाच पथकाने त्याला पकडले.

बातम्या आणखी आहेत...