आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संदेश:160 प्रकल्पांमधून साैरऊर्जा आणि ग्रामविकासाचा संदेश

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या सीडीओ मेरी हायस्कूलमध्ये विज्ञानप्रेमी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली १६० विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शनात सहभाग नोंदवला असून सौरऊर्जेचा जास्तीत जास्त वापर किती फायदेशीर तसेच ग्रामविकासातून उज्ज्वल भविष्य याचा संदेश या प्रदर्शनातून देण्यात आला.

शालेयस्तरावरील विज्ञान प्रदर्शनाचे उद‌्घाटन मुख्याध्यापक सुनील सबनीस यांच्या अध्यक्षतेखाली व सेवानिवृत्त विज्ञानशिक्षिका स्नेहल नानल यांच्या हस्ते करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष प्रा. सूर्यकांत रहाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. उपमुख्याध्यापक गंगाधर बदादे, पर्यवेक्षक सुरेखा सोनवणे, चिमण सहारे, शिक्षक मंडळ सदस्य दिलीप आहिरे उपस्थित होते. टाकाऊ वस्तूंपासून विविध प्रकल्प विद्यार्थ्यांनी साकारले. सकाळ व दुपार सत्रातील विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. शालेयस्तरावरील विज्ञान प्रदर्शनाचे यशस्वितेसाठी शाळेतील विज्ञानशिक्षक अनिल पवार आदींनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...