आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाफणा खून प्रकरण ​​​​​​​:न्यायालयाने तिघांची केली निर्दोष मुक्तता; खटल्यात 2 मुख्य आरोपींना ठरवले दोषी

नाशिक4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील बहुचर्चित बिपीन बाफणा खून खटल्याचा निकाल मंगळवारी लागला. न्यायालयाने या खटल्यात मुख्य आरोपी चेतन पगारे आणि अमन जट या दोघांना दोषी ठरवले. तिघांची निर्दोष मुक्तता केली. जिल्हा व सत्र न्यायाधीश आदिती कदम यांच्या न्यायालयात हा खटला सुरू होता. गुरुवारी दोघांना शिक्षा सुनावली जाणार आहे.

10 जून 2013 रोजी बिपिन बाफणाचे 1 कोटीच्या खंडणीसाठी अपहरण करत आडगाव शिवारात नेऊन त्याचा खून करण्यात आला होता. पंचवटी पोलिसांनी पगारे, जट याच्यासह अक्षय सुळेस संजय पवार, पम्मी चौधरी यांना अटक केली होती. या टोळीवर मोक्का कारवाई करण्यात आली आहे. संशयित मध्यवर्ती कारागृहात आहेत.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ओझर येथी व्यापारी गुलाबचंद बाफणा यांचा मुलगा बिपिन बाफणा हा डान्स क्लासला आला असताना 10 जून 2013 रोजी अपहरण करण्यात आले होते. पंचवटी पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. बिपिनच्या वडिलांकडे संशयितांनी 1 कोटीची खंडणी मागितली होती. खंडणी न दिल्यास मुलाचे बरे वाईट करण्याची धमकी दिली होती. बाफणा कुटुंबियांनी पोलिसांत खंडणीचा गुन्हा दाखल केला.

14 जून रोजी आडगाव शिवारात बिपिनचा मृतदेह आढळून आला होता. पोलिस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ निरीक्षक बाजीराव भोसले, नरेंद्र पिंगळे यांनी संशयित चेतन पगारे रा. ओझर, अमन जट रा. केवडीबन पंचवटी, अक्षय उर्फ बाल्या सुळे रा. नांदूर नाका, संजय पवार रा. बागवाणपुरा पम्मी चौधरी यांना अटक केली होती. संशयितांवर अपहरण, खंडणी आणि खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच गुन्ह्यात जट टोळीला मोक्का लावण्यात आला आहे. संशयित 2013 पासून कारागृहात आहेत.

खुनाच्या गुन्ह्याचा तपास तत्कालीन वरिष्ठ निरीक्षक बाजीराव भोसले, नरेंद्र पिंगळे, शरद सोनवणे, अजय गरुड यांनी केला. मोक्का चा तपास तत्कालीन सहाय्यक आयुक्त गणेश शिंदे यांना केला. या खटल्याची सुनावणी पुर्ण झाली. गुरुवार दि. 15 रोजी दोघांना शिक्षेची सुनावणी होणार आहे. 35 साक्षीदार तपासले. सरकारपेक्षा तर्फे अ‍ॅड. अजय मिसर यांनी कामकाज पाहिले.

बातम्या आणखी आहेत...