आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबिपीन बाफणा खून खटल्याची सुनावणी पूर्ण झाली आहे. या खटल्याचा निकाल मंगळवारी (दि. १३) लागणार आहे. जिल्हा व सत्र न्यायालयात हा खटला सुरू आहे. १० जून २०१३ रोजी बिपीन बाफणाचे खंडणीसाठी अपहरण करत आडगाव शिवारात नेऊन त्याचा खून करण्यात आला होता. अोझर येथील व्यापारी गुलाबचंद बाफणा यांचा मुलगा बिपीन बाफणा हा डान्स क्लासला आला असताना १० जून रोजी अपहरण करण्यात आले होते.
याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. १४ जून रोजी आडगाव शिवारात बिपीनचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी संशयित चेतन पगारे (रा. अोझर), अमन जट (रा. केवडीबन, पंचवटी), अक्षय सुळे (रा. नांदुरनाका), संजय पवार (रा. बागवानपुरा), पम्मी चौधरी यांना अटक केली. संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच गुन्ह्यात मोक्का लावण्यात आला आहे. संशयित २०१३ पासून कारागृहात आहेत. या बहुचर्चित खून खटल्याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.