आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरस्कार प्रदान‎:पाठांतर स्पर्धेद्वारे गंगा गाेदावरी जन्माेत्सव‎

नाशिक‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

श्री गंगा गोदावरी जन्मोत्सव ‎ सोहळ्यानिमित्त सांस्कृतिक‎ कार्यक्रम तथा पाठांतर स्पर्धेचे‎ अायाेजन करण्यात आले हाेते. या ‎ स्पर्धेचे बक्षीस वितरण नुकतेच पार ‎ पडले.‎ प्रमुख अतिथी डॉ. अतुल‎ वडगावकर आणि पूजा वडगावकर‎ यांच्या हस्ते पारिताेषिक वितरण‎ करण्यात आले.

यावेळी वेदशास्त्र‎ संपन्न घनपाठी अथर्व विलास‎ पाराशरे यांना "गोदारत्न’ पुरस्काराने‎ ‎सन्मानित करण्यात आले. यज्ञ‎ यजमान सुहास शुक्ल, भागवत कथा‎ यजमान जितेंद्र गायधनी यांनाही‎ सन्मानित करण्यात आले. यावेळी‎ पाठांतर स्पर्धांमध्ये सहभागी सर्व‎ शाळांचे विद्यार्थी मोठ्या संख्येने‎ उपस्थित होते. या उत्सवाच्या‎ ‎ ‎यशस्वितेसाठी सर्व पुरोहित संघाचे‎ अध्यक्ष सतीश शुक्ल तसेच‎ पदाधिकारी कल्पेश दीक्षित, शेखर‎ शुक्ल, प्रतीक शुक्ल, दिलीप शुक्ल,‎ चंद्रशेखर पंचाक्षरी, वैभव दीक्षित,‎ अमित पंचभये, संतोष पंचभये‎ आदींनी परिश्रम घेतले.‎

बातम्या आणखी आहेत...