आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक:‘बिटको’त पारितोषिक वितरण

नाशिक24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विद्यार्थ्यांनी बुद्धिमत्तेचा व कौशल्याचा वापर करून नवउद्योजकतेची कास धरली पाहिजे, असे आवाहन उद्योजक धनंजय बेळे यांनी केले.

गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाप्रसंगी ते बोलत होते. संस्थेचे विभागीय सचिव प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी, प्राचार्या डॉ. मंजूषा कुलकर्णी, उपप्राचार्य डॉ. अनिलकुमार पाठारे, डॉ. विद्युल्लता हांडे, विज्ञान विभागाचे समन्वयक प्रा. डॉ. टकले, डॉ. अनिल सावळे, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या सुनीता नेमाडे, पर्यवेक्षिका प्रणाली पाथरे, विद्यार्थी सभा कार्याध्यक्ष प्रा. लक्ष्मण शेंडगे, विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा. विशाल माने, डॉ. सुधाकर बोरसे, डॉ. आकाश ठाकूर, प्रा. विजय सुकटे, डॉ. विजया धनेश्वर, संजय परमसागर उपस्थित होते. अकरावी, बारावी व पदवी परीक्षांतील गुणवंत विद्यार्थ्यांसह पोस्टर व मॉडेलमेकिंगसह विविध स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना सन्मानित केले गेले.

बातम्या आणखी आहेत...