आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रपतींचा अपमान:काँग्रेस विरोधात भाजप आक्रमक; देशाची माफी मागून प्रायश्चित्त घ्या, आ. देवयानी फरांदे यांची मागणी

नाशिक6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशाच्या 15 व्या महिला राष्ट्रपतीपदी द्रौपदी मुर्मू यांची निवड करण्यात आली. तसेच मुर्मू यांच्याविषयी असंस्कृत आणि असभ्य टिप्पणी करण्यात आली. चौधरी यांच्या वक्तव्यास सोनिया गांधींनी प्रोत्साहन दिल्याने राष्ट्रपती मुर्मू यांचा अपमान झाला. असे असताना सोनिया गांधी आणि रंजन चौधरी या सर्व काँग्रेस पक्षाने माफी मागून प्रायश्चित्त घ्यावे अशी मागणी भाजपच्या आ.प्रा देवयांनी फरांदे यांनी केली.

काँग्रेसच्या निषेधार्थ तीव्र आंदोलन करणार

काँग्रेसकडून जोवर माफी मागितली जात नाही, तोवर भाजपतर्फे जागोजागी काँग्रेसच्या निषेधार्थ तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. भ्रष्टाचाराच्या आरोपावरून सुरू असलेल्या सोनिया गांधींच्या ईडी चौकशीस विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरून कायदा सुव्यवस्थेस बट्टा लावणाऱ्या काँग्रेस पक्षाने देशाच्या राष्ट्रपतींचा अपमान होत असताना आपण मौन का ? असा प्रश्न त्यांनी केला. लोकसभेत काँग्रेसचे गटनेते अधीररंजन चौधरी यांनी राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांचा उल्लेख राष्ट्रपत्नी असा केला. जाणीवपूर्वक अपमान करण्याच्या उद्देशाने चौधरी यांच्याकडून हा उल्लेख होत असताना सोनिया गांधी यांनी मात्र त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून वर्णवर्चस्ववादी मानसिकतेचे दर्शन घडवले आहे.

राष्ट्रपतींची माफी मागा

सभागृहाच्या शिस्तीला आणि सभ्यतेच्या संकेतास बट्टा लावण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून वारंवार होत असतो. चौधरी यांच्या राष्ट्रपती विषयीच्या या उद्दाम उल्लेखामुळे सभागृहाचा, राष्ट्रपतीपदाचा आणि देशाचा अपमान झाला आहे, अशी घणाघाती टीका आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी केली आहे. राष्ट्रपती श्रीमती मुर्मू यांचा अपमान करण्यासाठी सोनिया गांधी यांनी जाणीवपूर्वक चौधरी यांना फूस लावली असा आरोपही त्यांनी केला. सोनिया गांधी या स्वतः महिला असूनही त्यांनी महिलेविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या चौधरी यांना समज दिली नाही, असा आरोपही त्यांनी केला.

बातम्या आणखी आहेत...