आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यकर्ते खुशीत:भाजप व आपचा जल्लोष ; पाच राज्यांच्या निवडणूक निकालानंतर पेढे वाटून आनंदोत्सव

नाशिक7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे भाजपा व आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी शहरात जल्लोष केला. आम आदमी पक्षाने पंजाबमध्ये विजय संपादन केला. तर भाजपाने उत्तर प्रदेशसह तीन राज्यात विजयाचा गुलाल उधळला. त्यामुळे या दोन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शहरात स्वतंत्रपणे आनंदोत्सव साजरा केला.

आम आदमी पार्टीच्या वतीने सीबीएस येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत व पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. याप्रसंगी शहराध्यक्ष गिरीश उगले पाटील, बंडूनाना डांगे, प्रभाकर वायचळे, योगेश कापसे, अभिजित गोसावी, चंद्रशेखर महानुभाव संतोष राऊत अनिल फोकणे अभिजित गोसावी, नीलेश दिंडे, तुषार थेटे, अल्ताफ शेख, फारुक शेख, अनिल कौशिक, साहिल सिंग, चंदन पवार, जयंत मुळे, भगवान सराटे, इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते. भाजप कार्यालयात पदाधिकारी व कार्यकत्यांनी पेढे वाटप करत एकच जल्लोष केला.महिला कार्यकर्त्यांनी फुगडी खेळून नागरिकांचे लक्ष वेधले. पूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या या निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारली. याचाच जल्लोष ढोल-ताशांच्या गजरात ताल धरत साजरा करण्यात आला. पदाधिकाऱ्यांनी जल्लोष केला. कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...