आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:भाजपच्या नगरसेविकेसह युवा पदाधिकारी शिंदे गटाच्या वाटेवर

नाशिक4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात सत्ता असूनही भाजपमध्ये एकही इनकमिंग करण्यात शहराध्यक्ष गिरीश पालवे यांना अपयश आले असताना आता त्यांच्या पक्षाचा युवा व आक्रमक पदाधिकारी अशी ओळख असलेला भाजप कामगार आघाडी मोर्चाचा सरचिटणीस विक्रम नागरे व माजी नगरसेविका इंदुमती नागरे या बाळासाहेबांची शिवसेना अर्थातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या वाटेवर असल्याचे वृत्त आहे.

काही महिन्यांपूर्वी नागरे यांच्या घरावर हल्ला झाल्यानंतर त्यातील कुख्यात आरोपींवर कारवाई होत नसल्यामुळे आलेल्या नैराश्यातून ते भाजपला रामराम ठोकण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे. भाजपच्या एका स्थानिक आमदारांसोबत झालेले वितुष्टही यामध्ये कारणीभूत असल्याचे मानले जाते. नाशिक महापालिकेत गेल्या वेळी भाजपचे स्पष्ट बहुमताने ६६ नगरसेवक निवडून आले. मात्र गेल्या सहा वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले.

ठाकरे गटाला कोणाची मदत हे लवकरच कळेल
माझ्यावर हल्ल्याचा प्रयत्न करणारे सर्व आरोपी हे ठाकरे गटाशी संबंधित आहे. त्याबाबत कारवाई होत नाही. त्यांना नेमकी कोणाची मदत आहे हे लवकरच उघड हाेणार आहे. आम्ही उद्या राजीनामा देणार असून रविवारी अधिकृतपणे शिंदे गटात प्रवेश करणार आहाेत.- विक्रम नागरे, प्रदेश सरचिटणीस, भाजप उद्योग आघाडी

बातम्या आणखी आहेत...