आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रसार माध्यमांना माहिती देणारे काेण?:सातपूर मंडळातील अंतर्गत वादाची भाजपकडून चाैकशी सुरू

नाशिक23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजपच्या सातपूर मंडळात पक्षांतर्गत धुसफुस सुरू झाली असून प्रभाग क्रमांक 10 मधील नगरसेवक विरुध्द भाजप आमदार व त्यांचे निकटवर्तीय असा कलगीतुरा रंगला. यातून एकेमकांवर आराेप - प्रत्याराेपाच्या फैरी झडल्यानंतर प्रसार माध्यमांपर्यत बातम्या पाेहाेचवल्या काेणी? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. आता याच मुद्द्याची पक्षश्रेष्ठींनी चाैकशी सुरू केली आहे.

अंतर्गत वाद चहाट्यावर येत असल्याने त्याचा फायदा घेत अनेक पदाधिकारी आपआपल्या साेयीने ज्यांचा सबंध नाही, अशी नावे पक्षश्रेष्ठींपर्यत पाेहचवत असल्याने पक्षश्रेष्ठीनींही या कलगीतुऱ्यापुढे हात टेकल्याचे बाेलले जात आहे.

प्रभाग क्रमांक 10 च्या नगरसेविका माधुरी बाेलकर यांच्या कार्यालयात भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली हाेती. या बैठकीत निवडणूकीचा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर काही कार्यकर्त्यांनी प्रभाग क्रमांक 10 मधील विद्यमान नगरसेवकांबाबत नाराजी व्यक्त केली हाेती.

इतकेच नव्हे तर ते पक्षाशी एकनिष्ठ नसल्याने त्यांना उमेदवारी न देण्याची मागणी करण्यात आली हाेती. पक्षश्रेष्ठींनी जर पुन्हा ते उमेदवार आमच्यावर लादल्यास त्यांचे काम करणार नसल्याचा निर्धारही या बैठकीत करण्यात आला हाेता. बैठकीनंतर काही दिवसांनी याबाबतच्या बातम्या प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधीपर्यंत पाेहाेचल्या हाेत्या. त्यामुळे ज्यांना विराेध झाला त्यांनी आपल्यावरील आराेप झटकण्यासाठी ‘भाजपची पक्षनिष्ठा आम्हाला शिकवू नये’ या मथळ्याखाली प्रेस नाेट तयार करुन आमदार सीमा हिरे यांच्यासह माजी सभागृहनेते दिनकर पाटील यांच्या पक्षनिष्ठेविषयी संशय व्यक्त केला हाेता.

एकुणच सातपूर विभागातील पक्षांतर्गत दुफळी मुळे भाजपच्या पक्षशिस्तीची लक्तरे वेशीवर टांगली गेल्याने भाजपचे शहराध्यक्ष गिरीश पालवे यांनी याबाबतची खातरजमा करण्यासाठी अनेकांकडे विचारणा केली, मात्र त्यांच्यासमाेर वेगवेगळी नावे समाेर येत असल्यामुळे सातपूर मधील राजकारणापुढे त्यांनीही हात टेकले असे दिसत आहे.

एकमेकांच्या विराेधकांची नावे पुढे

प्रारंभी ज्यांच्या कार्यालयात बैठक झाली त्या नगरसेविका माधुरी बाेलकर व सामाजिक कार्यकर्ते गणेश बाेलकर यांच्याविषयी गैरसमज परसविण्यात आला. त्यानंतर माजी सभागृहनेते दिनकर पाटील यांचे नाव पुढे करण्यात आले हाेते. एकुणच कधी माजी मंडळ अध्यक्ष तर कधी विद्यमान मंडळ अध्यक्षाचे नाव पुढे करण्यात आले. नेहमी वेगवेगळी नावे पुढे येत असल्यामुळे पक्षश्रेष्ठींचीही गाेची झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...