आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराओबीसींच्या राजकीय आरक्षणावरुन महाविकास आघाडी सरकार आणि भाजपमध्ये चांगलीच खडाजंगी सुरु आहे. सर्वोच्च न्यायालयाने हे आरक्षण रद्द ठरवल्यानंतर हा वाद सुरु झाला आहे. ओबीसींचे राजकीय आरक्षण हे महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे गेले असा आरोप भाजपने अनेकवेळा केला आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्य सरकार हल्लाबोल केला आहे.
ते म्हणाले की, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात हे झारीतील शुक्राचार्य आहेत. त्यामुळे डिसेंबर 2022 पर्यंत ओबीसी आरक्षण द्यायचं नाही असा या सरकारचा प्लान असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. ते नाशिकमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
या सरकारच्या नाकर्तेपणामुळे हे आरक्षण गेलं
आमच्या सरकारने हे आरक्षण टिकवले असून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तसा अध्यादेश काढून ओबीसी आरक्षण आतापर्यंत टिकवून ठेवलं. परंतु, महाविकास आघाडी सरकारने या आरक्षण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आपली बाजू मांडलीच नाही. त्याचबरोबर न्यायालयाने सरकारला इम्पिरिकल डेटा तयार करण्याचे निर्देश दिले होते तेदेखील केले नाही. त्यामुळे ओबीसी आरक्षण हे या सरकारच्या नाकर्तेपणामुळे गेले असा आरोप बावनकुळे यांनी यावेळी केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.