आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिककरांसाठी महत्वाची बातमी:पंचवटीतील रामसृष्टीत साकारणार 51 फूट प्रभू श्रीरामचंद्रांचे शिल्प, आमदार ढिकलेंचे प्रयत्न

नाशिक21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जानेवारी २०२४ पर्यंत अयोध्यातील राम मंदिर पूर्णत्वास नेऊन भाविकांना खुले करण्यासाठी एकीकडे केंद्रातील भाजप सरकारचे प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे नाशिक पूर्व विधानसभेचे आमदार राहुल ढिकले यांनी पर्यटन विभागाकडून ५ कोटींचा विशेष निधी आणून पंचवटीतील तपोवनात असलेल्या रामसृष्टीत तब्बल ५१ फुटी प्रभू रामचंद्रांचे शिल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

तपोभूमी, सिंहस्थ भूमी तसेच देशभरामधील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गोदा किनाऱ्यावरील पंचवटीला त्यामुळे खऱ्या अर्थाने मोठे महत्त्व प्राप्त होणार असून भविष्यात भाविकांच्या आकर्षणाचे केंद्र म्हणून प्रभू रामचंद्र यांचे हे शिल्प नाशिकची कीर्ती देशभरात पोहचवेल असा विश्वास आमदार राहुल ढिकले यांनी व्यक्त केला.

नाशिक व पंचवटी म्हटले की श्री प्रभू रामचंद्रांचे स्मरण होत असल्याचे लक्षात घेत ढिकले यांनी या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना 'भव्य दिव्य' अशा शिल्पाद्वारे दर्शन करता यावे या दृष्टिकोनामधून तब्बल ५१ फूट शिल्प उभारण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी ११ ऑक्टोंबर २०२२ रोजी पर्यटन मंत्रालयाकडे पाठपुरावा सुरू केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्याकडे धाव घेत या शिल्पा संदर्भात संकल्पना सांगितल्यानंतर त्यांनी तात्काळ प्रस्तावाला गती दिली.

रामसृष्टी उद्यानामध्ये त्यासाठी जागा उपलब्ध होत असल्यानंतर त्या संदर्भात आवश्यक प्रक्रिया ही पूर्ण केली तसेच त्या ठिकाणी केवळ प्रभू रामचंद्रांचे शिल्पच उभारून चालणार नाही तर पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी संगीत कारंजा तसेच अत्यानुधिक पद्धतीने विद्युतीकरण करण्याचा निर्णय घेतला.

जवळपास चार महिने चिवटपणे पाठपुरावा केल्यानंतर अखेरीस, पर्यटन विभागाने ढिकले यांना पत्र पाठवत रामसृष्टी उद्यानामध्ये ५१ फूट प्रभू श्रीरामचंद्रांचे शिल्प उभारणी, या ठिकाणी विद्युतीकरण करणे व संगीत कारंजे करण्याच्या कामास मंजुरी दिली.

बातम्या आणखी आहेत...