आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नाशिकचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी शिवसेनेला धक्का देत भाजपमध्ये घरवापसी केली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत सानप यांचा मुंबईतील भाजप कार्यालयात पक्ष प्रवेश झाला. यावेळी फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. देशाचे भविष्य राहुल गांधी किंवा यूपीए नाही, तर वर्तमान आणि भविष्यही पंतप्रधान नरेंद्र मोदीच आहेत, असे ते यावेळी म्हणाले.
यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, भाजपचे आमदार आमच्याकडे येणार, अशा वावड्या महाविकास आघाडीचे नेते उठवत राहतात. पण, कुणीही पक्षात जाणार नाही. विरोधकांच्या आमदारांमध्ये प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे ते पुंग्या सोडतात आणि त्यांच्या पुंग्या त्यांचीच लोक वाजवतात, असा टोला फडणवीसांना लगावला. तसेच, विविध पक्षातून आलेले राजकीय नेते प्रगल्भ आहेत. या देशाचे भविष्य राहुल गांधी किंवा यूपीए नाही, तर वर्तमान आणि भविष्यही पंतप्रधान नरेंद्र मोदीच आहेत, याची त्यांना जाणीव आहे. एकत्र लढण्याचा तिन्ही पक्षांना तात्कालिक फायदा होईल, पण त्यांच्या राजकीय स्पेसमध्ये किती जण मावतील, यात शंकाच आहे आणि ती स्पेस भाजपसाठी मोकळी असून आम्ही व्यापल्याशिवाय राहणार नाही, असेही फडणवीस म्हणाले.
'धोक्याने आलेले सरकार जास्त काळ टिकत नाही'
यावेळी फडणवीस यांनी राज्यातीलमहाविकास आघाडी सरकारवरही जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, 'एखादे सरकार धोक्याने आले असेल तर ते जास्त काळ टिकत नाही, हे सर्वांना माहिती आहे. आगामी काळात तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन लढले पाहिजे. त्यामुळे जी राजकीय जागा निर्माण होईल, त्याचा फायदा आपल्यालाच होणार आहे. एखाद्या निवडणुकीत त्यांना फायदा झाला असेल पण आगामी निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरेल', असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.