आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यसभा निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारली. पीयूष गोयल, अनिल बोंडे व धनंजय महाडिक यांचा विजय झाल्याबद्दल शनिवारी (दि. ११) शहर भाजप कार्यालयात जोरदार सेलिब्रेशन करण्यात आले. ढोल-ताशांच्या गजरात पदाधिकारी-कार्यकर्ते मोठ्या उत्साहात थिरकले. घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता.
राज्यसभा निवडणुकीत धनंजय महाडिकांच्या माध्यमातून भाजपचे तिसऱ्या जागेवरही विजय मिळविला. या विजयाचे सेलिब्रेशन करण्यासाठी ‘वसंतस्मृती’ या शहर भाजप कार्यालयात सकाळपासून पदाधिकारी व कार्यकर्ते जमण्यास सुरुवात झाली होती. देवेंद्र फडणवीस यांच्या नियोजनातून तिसरी जागाही निवडून आली. त्यामुळे कार्यकर्त्यांनी ‘देवेंद्र फडणवीस तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है..., भारतीय जनता पार्टीचा विजय असो’ अशा घोषणा दिल्या. फटाके फोडत तसेच महिला व पुरुष पदाधिकाऱ्यांनी फुगड्या खेळत विजयोत्सव साजरा केला. यावेळी भाजप उत्तर महाराष्ट्र संघटनमंत्री रवी अनासपुरे, शहराध्यक्ष गिरीश पालवे, आमदार सीमा हिरे, लक्ष्मण सावजी, प्रशांत जाधव, अरुण शेंदुर्णीकर, अविनाश पाटील, सुनील देसाई, शिवाजी बरके, भास्कर घोडेकर, भगवान काकड, काशीनाथ शिलेदार, अमित घुगे, रोहिणी नायडू, अजिंक्य साने, महेश हिरे, अलका जांभेकर, सुजाता करजगीकर, उद्धव निमसे, रुची कुंभारकर, प्रतिभा पवार, विक्रम नागरे, दिगंबर धुमाळ, वसंत उशीर, कुणाल वाघ, आशिष नहार आदींसह कार्यकर्ते यावेळी माेठ्या संख्येने सहभागी झाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.