आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यात रस्ते अपघातांची संख्या वाढत असून जानेवारी २०२२ जून या सहा महिन्यांच्या कालावधीत नाशिक शहर व जिल्ह्यात ६०२ जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे. मागील काही वर्षांपासून रस्ते अपघातांचे प्रमाण वाढले असून राज्यातील सहा महिन्यांची आकडेवाडी पाहता १७ हजार २७५ अपघात झाले असून यात ८ हजार ६८ जणांचा विविध अपघातांत मृत्यू झाला आहे.
१४ हजार २०० जण कायमचे जायबंदी झाले आहेत. जिल्ह्यात ५१८ व शहरात १०२ अपघाती मृत्यू झाले आहे. राज्यातील आकडेवारी बघता नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. रस्ते अपघात रोखण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाकडून प्रभावी नियोजन होत नसल्याने अपघातांची संख्या वाढत आहे.
नाशिक आरटीअोकडून रस्ते सुरक्षा अभियान अंतर्गत उपक्रम केले जातात. मात्र रस्ते अपघात टाळण्यासाठी ठोस नियोजनाचा अभाव दिसून येत आहे. जानेवारी ते जून २०२२ राज्यात अपघातांची आकडेवारी बघता नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक अपघातांची नोंद झाल्याने जिल्ह्यातील रस्ते मृत्यूचा सापळा बनले आहेत. राज्यात १७ हजार २७५ अपघातात ८०८६ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये नाशिक विभागातील नाशिक जिल्हा व शहरातील रस्त्यांवर घडलेल्या अपघातात ६०२ जणांचा मृत्यू झाला आहे. अहमदनगरमध्ये ४५१ जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे. पुणे जिल्ह्यात ४६१, शहरात १६५ मुंबई शहरात १५६ अपघाती मृत्यू झाले आहे.
राज्यातील 38 जिल्ह्यातील जिल्हानिहाय अपघातांची आकडेवारी
नाशिक : ५१८, नंदुरबार : १०२, अहमदनगर : ४५१, धुळे : १९९, जळगाव : २९५, अकोला : ७६, अमरावती : १८७, बुलढाणा : २०४, यवतमाळ :२२६, वाशिम : ८२, अौरंगाबाद : २५३, जालना : २०५, बीड : २५६, उस्मानाबाद :१८४, नांदेड : १९७, लातूर : १७७, परभणी : ९५, हिंगोली : ११०, कोल्हापूर : २४१, पुणे :४६१, सांगली : २१३ सातारा- २७६, सोलापूर : ३२५, भंडारा : १०१, चंद्रपूर : २४२, गडचिरोली : २४२, गाेंदिया : ७६, नागपूर : २६०, वर्धा: १२५, रायगड : ९५, रत्नागिरी : ९५, सिंधुदुर्ग : ३८, ठाणे : ११९ तर नाशिक शहर- १०२, मुंबई- १५६, औरंगाबाद- १०१ , नवी मुंबई : १५६, अमरावती : ५३, पिंपरी चिंचवड : १५२
आरटीआेकडून उपाययाेजना सुरू
रस्ते अपघात रोखण्यासाठी आरटीअोकडून रस्ते सुरक्षा अभियानांतर्गत प्रभावी नियोजन केले जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेप्रमाणे ब्लॅक स्पाॅट निश्चित करण्यात येत असून या स्पाॅटवर अपघात रोखण्यासाठी नियोजन केले जात आहे. - वासुदेव भगत, उपप्रादेशिक अधिकारी, आरटीओ
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.