आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम:भारतीय जैन संघटनेतर्फे 70  गरजूंना ब्लँकेट

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

थंडीचा कडाका वाढताच भारतीय जैन संघटनेच्या वतीने त्र्यंबकेश्वर राेडवरील दुबेवाडीतील ७० नागरिकांना ब्लँकेटचे वाटप करत मदतीचा हात देण्यात आला. ८ दिव्यांग नागरिकांना ब्लँकेट, किराणा, गृहाेपयोगी वस्तू देखील देण्यात आल्या.संघटनेच्या वतीने वर्षभर विविध सामाजिक, शैक्षणिक उपक्रम राबविले जातात. आर्थिक परिस्थितीमुळे दुर्गम भागातील गरीब कुटंुबातील अनेक जण स्वत:साठी स्वेटर, ब्लँकेट घेऊ शकत नाही.

याचाच विचार करत ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे गरजू कुटुंबाच्या चेअऱ्यावर हास्य फुलले. दिव्यांगाप्रती सामाजिक भाव प्रत्येकाने जपावा, असे मनाेगत मान्यवरांनी व्यक्त केले. संघटनेचे सदस्य ललित कुमार सुराणा, गौरव बाफना, मनीष शहा, रोशन टाटिया, विक्रम कर्नावट, प्रशांत छाजेड आदींनी कार्यक्रमासाठी प्रयत्न केले.

बातम्या आणखी आहेत...