आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील जांबूत ह्या खेड्यावरील अंध मुलगी पूजा भगवान नरवडे हिच्यावर बिबट्याने प्राणघातक हल्ला केला. यातच तिचा मृत्यू झाला. पूजाचे आई - वडील व दोन बहीणी असे सर्व अंध कुटुंब आहेत. त्या कुटुंबाला नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईंड महाराष्ट्रच्या वतीने अंध कल्याण निधी अंतर्गत आर्थिक मदत म्हणून वीस हजारांचा धनादेश पूजा नरवडे हिचे वडील भगवान नरवडे यांना देण्यात आला.
नॅब महाराष्ट्रचे पदाधिकारी सर्वश्री मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, शाम पाडेकर, विनोद जाधव, रत्नाकर गायकवाड यांनी कुटुंबियांची प्रत्यक्ष भेट घेवून घटनेची माहीती घेतली. मयत पूजा ही शिक्षण घेत होती. व ती हुशार मुलगी (अंध) होती. सामाजिक दायीत्व म्हणून नॅब महाराष्ट्रचे अध्यक्ष रामेश्वर कलंत्री, मा.महासचिव गोपी मयूर यांनी मदत देण्याचे सहयोग दिले.
तिला शासनाच्या वनविभागा कडूनही मदत मिळवून देण्याचा प्रयत्न नॅब महाराष्ट्र तर्फे करण्यात येईल. ह्या कार्यात शिरूर येथील पंचायत समितीचे समावेशित शिक्षणाचे सर्वश्री संदीप क्षिरसागर व विशेष शिक्षक राहुल आवारी ह्यांचे सहकार्य लाभले. कुटुंबाला मदतीचा आधार दिल्याबद्दल शिरूर येथील पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी आणि लोक प्रतिनिधी आमदार अशोक बापू पवार यांनी नॅब महाराष्ट्रचे आभार व्यक्त केले.
यावेळी शिरूर तालुक्याचे आमदार अशोक बापू पवार, तहसीलदार बाळासाहेब म्हसके, पंचायत समिती शिरूरचे गट विकास अधिकारी श्री.अजित देसाई, गटशिक्षणाधिकारी श्री.अनिल बावर, पंचायत समिती चे अधिकारी होलगुंडे, समग्र शिक्षा चे सर्व कर्मचारी यांच्या उपस्थितीत होते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.