आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालाेकसभा निवडणूक साधारण वर्षभरावर असताना अचानक कांद्याच्या मुद्यावरून तापलेले राजकारण व आपल्या दिंडाेरी लाेकसभा मतदारसंघातील चांदवडमध्ये राष्ट्रवादी काॅंग्रेसने माजी खासदार समीर भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली माेर्च्याचे आयाेजन केल्याचे बघून संभाव्य नाकेबंदीसाठी केंद्रीय आराेग्य राज्यमंत्री तथा या मतदारसंघाच्या खासदार डाॅ भारती पवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत एकूणच राजकारण उलघडवले.
आशिया खंडातील सर्वात माेठी बाजारपेठ असलेल्या कांद्यावरून देशात चांगलेच राजकारण तप्त झाले आहे. दिल्लीमध्ये सुरू असलेल्या संसदेच्या अधिवेशनात विराेधक आक्रमक हाेत आहे. एकीकडे दिल्लीत कांद्याने डाेळ्यात पाणी आणले असताना, डाॅ पवार यांच्या मतदारसंघातही राजकारण रंगू लागले आहे. याेगायाेगाने याच मतदारसंघात लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीसारखी माेठी कांद्याची बाजारपेठ आहे. चांदवड, देवळा, निफाडसारख्या जिल्ह्यात कांद्याचे माेठे पीक उभे राहत असल्यामुळे येथे राष्ट्रवादीने भाजपाला घेरण्याची तयारी सुरू केली आहे. वर्षभरावर येवून ठेपलेल्या लाेकसभा निवडणुकीच्यापार्श्वभुमीवर वेळीच कांद्याचा मुद्दा शांत केला नाही तर सत्ताधाऱ्यांना नाकीनऊ येवू शकतात हे लक्षात घेत पवार यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच झाडझडती घेतली. एवढेच नव्हे तर, कांद्याचे अर्थकारण करणाऱ्या संस्था, व्यक्तींनाही सरळ करण्याची तंबीही दिली.
पवार-भुजबळांमध्ये पहिल्यापासूनच शीतयुद्ध
जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे अनुसूचित जमातीसाठी राखीव असताना व राष्ट्रवादीची सत्ता असताना स्व. आमदार ए.टी पवार यांच्या दाेन्ही सुना याेगायाेगाने जिल्हा परिषद सदस्या हाेवून प्रबळ दावेदार झाल्या. तात्कालीन पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यासमाेर काेणाची निवड करायची हा प्रश्न हाेता. त्यावेळी राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार व तेव्हा जि.प सदस्य असलेल्या नितीन पवार यांच्या पत्नी जयश्री यांना लाल दिव्याचा मान दिला गेला. त्यामुळे डाॅ भारती पवार या नाराज झाल्याची चर्चा हाेती. पुढे 2019 मध्ये डाॅ पवार यांना डावलून राष्ट्रवादीची उमेदवारी शिवसेनेतून आलेल्या धनराज महाले यांना देण्यात भुजबळ यांनी माेठी भुमिका निभावल्याचे आराेप झाले. त्यानंतर पवार या भाजपात जावून खासदार झाल्या. याबाबत पवार यांनी उघडपणे कधीही याबाबत नाराजी व्यक्त केली नसली तरी, सुप्त संघर्ष कायम चर्चत राहीला.
राष्ट्रवादीचे आज कांदा आंदाेलनाद्वारे शक्तीप्रदर्शन
कांद्याला किमान 2500 रुपये हमीभाव जाहीर करावा या प्रमुख मागणीसाठी आज शुक्रवार 10 मार्च रोजी सकाळी 10 वाजता चांदवड येथे माजी खासदार समीर भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रास्ता रोको करण्यात येणार आहे
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.