आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागरिक भयभीत:खून; खुनाचा प्रयत्न, खुनाच्या संशयाने दिवस चर्चेत ; आईला कामावरून काढल्याने मुलांकडून खून

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अंबड औद्योगिक वसाहतीतील गंगोत्रीसमोरील आहेर इंजिनिअरिंग कंपनीचे व्यवस्थापक नंदकुमार निवृत्ती आहेर (५०, रा. महात्मानगर) हे नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळी १० वाजता आपल्या चारचाकीने कंपनीत आले. कंपनीच्या गेटवर गाडी उभी करून उतरत असताना, आधीच दबा धरून बसलेल्या तिघांनी त्यांच्या दिशेने धावत येत थेट तलवार व चाकूने वार केले. काही क्षणांतच आहेर हे रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळले. गेटवरील आवाजाने कंपनीतील कामगार बाहेर पळत आले. त्यांना पाहताच हल्लेखोर युवक हातातील हत्यारे तेथेच टाकून दुचाकीवर पसार झाले. काही क्षणांतच अंबड पाेलिस त्या ठिकाणी दाखल झाले. त्यानंतर दुपारी सहायक आयुक्त, उपायुक्त अमोल तांबे यांच्यासह आयुक्त नाईकनवरे यांनी घटनास्थळी भेट देत माहिती घेतली.

कृषी मंत्र्यांशी आहेर संबंधित : मयत नंदकुमार आहेर हे आहेर इंजीनियरिंग अँड फेब्रिकेशन या कंपनीचे व्यवस्थापक होते. कंपनीचे मालक उद्योजक प्रवीण आहेर यांचे ते पुतणे होते. प्रवीण आहेर हे कृषी मंत्री दादा भुसे यांचे जवळचे नातलग आहेत. अंबड पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह? : शहरातील सर्वात महत्वाचे व अतिसंवेदनशील पोलिस ठाणे म्हणून अंबड पोलिस स्टेशनची ओळख आहे. असे असताना सततच्या चो-या, हाणामाऱ्या, किरकोळ गुन्हे व थेट खून अशा घटनांमुळे गुन्हेगारीचा आलेख वाढत आहे. येथील वरिष्ठ पोलिस निरीक्षकांचा इतर आधिकारी व कर्मचाऱ्यांवर वचक नसून वरिष्ठ निरीक्षकांवर सहाय्यक आयुक्त व उपायुक्त यांचा वचक नसल्याचा आरोप होतो आहे. मुळात येथील नागरिकांना वरिष्ठ निरीक्षक, उपायुक्त व सहाय्यक आयुक्त कोण? हेच माहीत नसल्याने या आधिका-यांची कार्यपद्धती नागरिकांपर्यंत पोहचू शकत नसल्याने गुन्हेगारीच्या घटना वाढत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.

म्हसरुळ : चारित्र्यावर संशय

पत्नीचा चिरला गळा; पतीने केली आत्महत्या

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने तिचा कटरने गळा चिरून खून करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर भेदरलेल्या पतीने इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केल्याचा प्रकार मंगळवारी (दि. ७) सायंकाळी ४ वाजता म्हसरुळ शिवारातील रामकृष्णनगर येथे उघडकीस आला. राजीव रतनसिंग ठाकूर (५०) असे मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रामकृष्णनगर येथील लक्ष्मी रेसिडेन्सी या इमारतीमध्ये तिसऱ्या मजल्यावर राजीव ठाकुर हे पत्नी संध्या ठाकूर (४५) हे दोन मुलांसह वास्तव्यास आहे. सायंकाळी पती-पत्नीमध्ये वाद झाले. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने तिला शिवीगाळ करत मारहाण केली. पेपर कापण्याच्या कटरने पत्नीच्या गळ्यावर वार केला. गळ्याची नस कापल्याने रक्ताची चिळकांडी उडाल्याने पत्नी जागेवर कोसळली. पत्नीचा खून केल्याने पतीने देवघराच्या गॅलरीतून खाली उडी घेतली. डोक्यास गंभीर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. इमारतीमधील नागरिकांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या संध्या ठाकूर यांना तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले. म्हसरुळ पोलिस ठाण्यात मयत राजीव ठाकूर यांच्याविरोधात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दाम्पत्याला दोन मोठी मुले ठाकूर दाम्पत्याला २५ आणि २३ वर्षांची अशी दोन मुले आहे. ठाकूर हे पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने दोघांमध्ये नेहमी वाद होत असत. यापूर्वी दोघांमध्ये वाद झाले होते. घटनेच्या वेळी दोन्ही मुले बाहेर गेल्याची संधी साधत पतीने पत्नीला मारण्याचा प्रयत्न केला.

बातम्या आणखी आहेत...