आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फसवणुकीचा गुन्हा दाखल:बीएमडब्ल्यू कार ; अर्ध्या किमतीचे आमिष, दोघांना १० लाखांचा गंडा

नाशिक25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीएमडब्ल्यू कंपनीमध्ये असिस्टंट व्हाॅइस प्रेसिडंट असल्याचे भासवत बीएमडब्ल्यू २ सिरीज ही कार मूळ किमतीच्या ५५ टक्के कमी दरात घेऊन देण्याचे आमिष देत शहरातील दोघा व्यावसायिकांना १० लाखांचा गंडा घातल्याप्रकरणी संशयित अमितकुमार घोष या तोतयाच्या विरोधात गंगापूर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती आणि चेतन प्रभू (रा. शंकरनगर, गंगापूररोड) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ११ एप्रिल रोजी घरी असताना अनोळखी नंबरवरून फोन आला. बीएमडब्ल्यू कंपनीचा व्हाॅइस प्रेसिडेंट असल्याचे संशियताने सांगितले. साऊथ ईस्ट आशियात कार सेल करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे, असे सांगत विश्वास संपादन केला. तुम्ही बीएमडब्ल्यू २ सिरीज कार घेण्याच्या विचारात आहात, असे समजले. तुम्ही खरोखर इच्छुक असाल तर ५५ टक्के कमी दरात कार मिळवून देतो, असे सांगितले. याकरिता आपणास अगाऊ बुकिंग करावी लागेल असे सांगत एचडीएफसी, आयसीआयसीआय बँकेचा खाते नंबर दिले. प्रभू हे कार घेण्यास इच्छुक असल्याने त्यांनी संशयितांनी दिलेल्या खात्यात आरटीजीएसद्वारे ५ लाखांची रक्कम अकाऊंट टू अकाऊंट ट्रान्सफर केली. कार बुकिंग झाल्याबाबत काहीच माहिती मिळत नसल्याने संशयितास फोन केला, मात्र त्याने प्रतिसाद दिला नाही.

माहिती घेतली असता संशयिताने कुमार दाणा या व्यावसायिकालाही अशाच प्रकारे ४ लाखांची रक्कम खात्यात आॅनलाइन भरण्यास सांगितले तसेच संशयिताची पत्नी बिपाशा भौमिक हिला ५० हजार आरटीजीएसने व ५० हजार रोख दिले होते.त्यांचीही फसवणूक झाल्याचे समजले. वरिष्ठ निरीक्षक रियाज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...