आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महसूल विभागात लाचखोरी!:खासगी व्यक्तीच्या मध्यस्थीने 50 हजारांची लाच घेताना मंडळ अधिकारी अटकेत

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मंडळ कार्यालयात दिलेला अर्जाचा निकाल देण्यासाठी 1 लाखांची लाचेची मागणी करत 50 हजारांची लाच खासगी महिलेच्या वतीने स्विकारणारा मंडळ अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. पाथर्डी गावात पथकाने ही कारवाई केली.

पुरुषोत्तम दत्तात्रय पराडकर (वय 41 ) खासगी महिला केतकी किरण चाटोरकर असे या लाचखोर मंडळ अधिकारी व खासगी महिलेचे नाव आहे. इंदिरा नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेली माहिती आणि तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीनुसार, पाथर्डी मंडळ अधिकारी कार्यालयात शेती संदर्भात अर्ज केला होता. या अर्जावर मंडळ अधिकारी पराडकर याच्या समोर सुनावणी झाली होती. हा अर्ज निकाली काढत तक्रारदाराच्या बाजुने निकाल देण्यासाठी पराडकर याने खासगी महिला केतकी चाटोरकर हिस मध्यस्थ टाकले. चाटोरकर य हीने तक्रारदार यांच्याशी संपर्क साधला. सर्कल साहेब तुमच्या बाजुने निकाल लावून देण्यास तयार आहेत. यामोबदल्यात 1 लाखांची मागणी केली. तक्रारदाराने पैसे देण्यास तयारी दर्शवली सुरवातीला 5 हजार देण्याचे ठरले.

तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. पथकाने पाथर्डी गावातील मंडळ अधिकारी कार्यालयात सापळा रचला. तक्रारदाराकडून 50 हजारांची लाच घेतांना खासगी महिलेला अटक केली. वैशाली पाटील, शरद हेबांडे, राजेंद्र गिते, शीतल सुर्यवंशी, यांच्या पथकाने अधिक्षक सुनील कडासणे, अपर अधिक्षक नारायण न्याहळदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.

लाचखोरी वाढली

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून लाचखोर प्रतिबंध सप्ताब सुरू आहे. याकालावधीत विभागाकडून शासकीय कार्यालयात आणि सर्व सार्वजनिक ठिकाणी जनजागृती सुरू आहे. दोन दिवसांपुर्वी पथकाने येथे पत्रक वाटप केले होते. यानंतरही अधिकाऱ्यांकडून लाच स्विकरली गेल्याने अश्चर्य व्यक्त होत आहे.

खासगी एजंट वाढले

तलाठ, मंडळ अधिकारी यांच्या कार्यालयात खासगी एजंट वाढले आहे.या एजंटच्या माध्यमातून तक्रारदारांना हेरुन त्यांना काम करण्याचे आमिष देत त्यांच्याकडून हे अधिकारी लाच घेत आहे.

पैशांचा हिशोब नाही

तलाठी कार्यालयात सातबारा उतारे, विविध नोंदी, आणि अन्य जुन्य कागदपत्र काढण्यासाठी लोक येतात. त्यांच्याकडून कार्यालयात काम करणारे खासगी कामगार आणि कोतवाल पाहिजे तेवढे पैसे घेतात. याचा हिशोब केला जात नसल्याने हा भरणा शासकीय तिजोरीत जातो की खिशात हा प्रश्न उपस्थित होत आहे

बातम्या आणखी आहेत...