आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मालदीवला जुलै महिन्यात जागतिक शरीरसाैष्ठव स्पर्धा:शरीरसाैष्ठवपटू हबीबची ‘मिस्टर वर्ल्ड’साठी निवड

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पजाबमध्ये नुकताच झालेल्या शरीरसाैष्ठव स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावरील मिस्टर इंडिया स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावणाऱ्या नाशिकच्या २९ वर्षीय हबीब सय्यद याची मालदिव येथे होणाऱ्या मिस्टर वर्ल्ड स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. जुलै महिन्य‍ात होणाऱ्या या मिस्टर वर्ल्ड स्पर्धेचे सुवर्णपदक जिंकण्याचे ध्येय असल्याचे त्याने ‘दिव्य मराठी’शी बोलताना सागितले.

पजाबच्या लुधियाना जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या शरीरसाैष्ठव स्पर्धेत हबीब सय्यदने राैप्यपदक पटकावले. या स्पर्धेत हबीब सय्यदने ८० ते ८५ किलो वजन गटात देशात दुसरा क्रमांक पटकावला. या गटामध्ये भारतातील विविध राज्यांतील टॉप ५० स्पर्धकांनी सहभाग घेतल्यामुळे या गटात जोरदार चुरस हाेती. या स्पर्धेसाठी देशभरातील विविध जिल्ह्यांतून पाचशेवर खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. हबीब सय्यदने गेल्या दोन वर्षात राज्यस्तरीय स्पर्धेत सातत्याने सुवर्णपदक मिळवत नाशिकचे नाव उंचावले आहे.

२०१७ मध्ये नाशिक श्री तर २०२२ मध्ये मिस्टर इंडिया हबीबला २०१७ साली प्रथमच ‘नाशिक श्री’ होण्याचा मान मिळाला होता. त्यानंतर सय्यद सलग तीन वर्ष ‘मिस्टर नॉर्थ महाराष्ट्र’ शरीरसाैष्ठव स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले आहे. २०२० साली महाराष्ट्र श्री स्पर्धेत कास्य पदक तर २०२२ मध्ये सुवर्ण पदक मिळविले. याच वर्षी पुन्हा ‘मिस्टर नॉर्थ महाराष्ट्र’ स्पर्धेत ‘मिस्टर मस्क्युलर टायटल’ या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकवला.

आता ध्येय मिस्टर वर्ल्ड मिस्टर इंडिया स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावल्यानंतर माझी निवड मालदिव येथे जुलैमध्ये होणाऱ्या मिस्टर वर्ल्ड स्पर्धेसाठी झालेली आहे. या स्पर्धेसाठी दररोज सहा तास सराव करत आहे. माझे ध्येय आता ‘मिस्टर वर्ल्ड’ किताब देशात आणणे हे आहे. - हबिब सय्यद, मिस्टर इंडिया रनरअप

बातम्या आणखी आहेत...