आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला दिन विशेष:‘बाॅडीबिल्डर क्वीन’‎ नाशिकच्या स्नेहा काेकणे-पाटील यांची शरीरसाैष्ठवमध्ये आंतरराष्ट्रीय भरारी‎

नाशिक‎22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पहिलवान फक्त पुरुषच असावे या‎ मक्तेदारीला मेहनत व कष्टाने स्नेहा‎ काेकणेपाटील यांनी माेडून काढले‎ आहे. विविध स्पर्धेत सहभागी हाेत‎ त्यांनी आतापर्यंत विविध ११८‎ पारिताेषिके मिळवली आहेत.‎ एक-एक पुरस्कारप्राप्त करत‎ भारतश्री व त्यानंतर इंटरनॅशनल‎ डायमंड कप (आशिया)मध्ये‎ देशाचे प्रतिनिधित्व करत राैप्यपदक‎ पटकावले. यामुळे भारतातील प्राे‎ कार्डधारक महला शरीरसाैष्ठव‎ हाेण्याचा मान मिळाला. त्यांना‎ आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे‎ प्रतिनिधित्व करायचे आहे.‎

अरनाॅल्ड क्लासिक या स्पर्धेत‎ आजपर्यंत एकही भारतीय महिला‎ गेलेली नाही. त्यामुळे त्या ठिकाणी‎ जात देशासाठी पदक मिळवायचे‎ ध्येय असल्याचे त्या सांगतात.‎ ‎ ‎ ‎ ‎ कराटे ब्लॅक ब्लेट असलेल्या स्नेहा‎ पती व कुटुंबीयांच्या साेबतीमुळे‎ नाशिक -श्री, महाराष्ट्र-श्री, भारत-श्री,‎ आंतरराष्ट्रीय डायमंड स्पर्धेत डायमंड‎ स्पर्धेत राैप्यपदक असे यशाेशिखर‎ प्राप्त केले. विशेष म्हणजे या पुरती‎ मर्यादित न राहता स्वरक्षणासाठी‎ मुलींना कराटेचेही प्रशिक्षण देत‎ त्यांनाही घडविण्याचे काम त्या करत‎ आहेत.‎

शेतकरी कुटुंबातील मुलगी ते आंतरराष्ट्रीय‎ शरीरसाैष्ठव असा त्यांचा प्रवास आहे.‎ कुटंुबासह एकदा बाॅडी एक्स्पाे पाहण्यासाठी‎ त्या गेल्या हाेत्या. यात एकही मुलगी‎ नसल्याचा प्रश्न मनात निर्माण हाेत पुढे‎ प्रवास सुरू झाला. पती सचिन काेकणे व‎ कुटुंबीयांचे पाठबळ देखील त्यांना मिळाले.‎ शरीरसाैष्ठवसाठी याेगा, व्यायाम, कार्डिआे,‎ कराटे यासह डाएटवर लक्ष देऊन बाॅडी‎ बिल्डिंगवर लक्ष केंद्रित केले. मुली-तरुणींनी‎ आपल्या कलागुणांना वाव द्यावा यासाठी‎ स्नेहा काेकणे यांना माेटिव्हेशन स्पीकर्स‎ म्हणूनही त्यांना मार्गदर्शन करत असतात.‎

बातम्या आणखी आहेत...