आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी इन्व्हेस्टिगेशन:बोगस डॉक्टरांची ‘राँग प्रॅक्टिस’ नाशिकसह शहरात बोगस डॉक्टरकडून रुग्णांच्या जिवाशी खेळ, ‘दिव्य मराठी’च्या स्टिंग ऑपरेशनमध्ये डॉक्टरांचा केला पर्दाफाश

नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एका डॉक्टरला फक्त मूळव्याध असल्याचे सांगताच त्याने तपासणी न करता थेट सलाइन लावत त्यात तीन-चार इंजेक्शन्स टाकले. त्याचे ५०० रुपये घेतले. तर सातपूरमध्ये पेशंटला एक जण थेट सलाइन देत हाेता. ज्या काही पदव्या आहेत त्या याेग्य असल्याचा दावाही केला. नाशिक जिल्ह्यात अशा बनावट, बोगस डॉक्टरांमुळे अनेकांचा जीव धाेक्यात येत आहे. ‘दिव्य मराठी’ने याचा पर्दाफाश करतानाच व्हिडिआे चित्रणही केले आहे. अशी आहे शिक्षेची तरतूद : बोगस डॉक्टरांविरुद्ध अधिनियम १९६१ च्या कलम ३३, ३५ व ३६ नुसार जामीनपात्र गुन्हा दाखल हाेताे. रुग्णाचा मृत्यू झाल्यास कारवाई हाेते.

प्रसंग 1 : ठिकाण : जाखाेरी, तालुका सिन्नर डॉक्टरचे नाव : प्रणव ठाकूर आम्ही : डॉक्टर आहेत का? आम्ही कासारवाडीहून आलाेय. त्यांना जरा भेटायचे आहे. मूळव्याधीचा खूप त्रास हाेत आहे. अशक्तपणाही आहे. ताे : मैं खुद हूं डॉक्टर.. इस स्ट्रेचर पर लेटिये... (तपासल्यानंतर) सलाइन, इंजेक्शन ले लाे... आपको फिशर (मूळव्याध) है. ये पूरा बंद हाेने के लिए १२ हजार रुपये लगेंगे. उसमे दवा ही आ जायेगी. आपके लिये दस हजार में कर देता हूँ. उसमें सातसाै रुपयाें की दवा मैं देता हूं. जल्द से जल्द कर लाे, नहीं ताे खर्चा १ लाख तक जायेगा. अभी के ५०० रुपये हाे गये. उतने ताे दे दो.

आप कहाे... अभी गांव चला जाता हूं
त्याचं सगळं बोलून झाल्यावर त्याला आम्ही आमची आेळख देताच त्याची भंबेरी उडाली. फक्त स्ट्रेचरवर झाेपवून थेट सलाइन लावली, इंजेक्शन्स दिले. तुमची पदवी दाखवा असे विचारताच त्याने घेतलेले पाचशे रुपये परत दिले. तुम्ही म्हणत असाल तर आजच दवाखाना बंद करताे व गावाला जाताे, असे कळवळ्याने म्हणू लागला.

प्रसंग 2 : प्रबुद्धनगर, सातपूर, माताेश्री क्लिनिक
डॉक्टरचे नाव : चंद्रकांत साेनवणे
आम्ही : डॉक्टर घसा दुखताे आहे. दुसरं काहीच हाेत नाही.
ताे : (माेबाइलच्या बॅटरीने घसा तपासत) कधीपासून त्रास हाेताे आहे? ताप, खाेकला, काही अडकल्यासारखे वाटते का? (त्याने प्रिस्क्रिप्शन लिहून दिले आणि आम्ही क्लिनिकमधून बाहेर पडलाे.) त्याच वेळी एक वृद्धा तिथे आली आणि डॉक्टरांसमाेर पाच रुपये ठेवत तिने चमकीची गाेळी मागितली. डॉक्टरांनी गाेळी नसल्याचे सांगितले. मात्र क्लिनिकच्या बाहेर आम्ही काही रुग्णांकडे चाैकशी केली असता ताे रुग्णांना सलाइन लावून त्यात इंजेक्शन देत असल्याचे सांगितले.

पदवी इलेक्ट्रो हाेमिआेपॅथीची
आम्ही पदवीबाबत विचारले असता माझ्याकडे इलेक्ट्रो हाेमिआेपॅथीची पदवी असून न्यायालयाच्या आदेशाने प्रॅक्टिस करत आहे. पुण्याच्या रुबी हाॅस्पिटलमध्ये बीईएमएसचा कोर्स केला असून १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेवर डॉक्टर म्हणून अनुभव असल्याचे त्याने सांगितले. मात्र रुग्णांना इंजेक्शन व सलाइन देत असल्याचा मात्र त्यांनी इन्कार केला.

फक्त चारच पॅथींना मान्यता
^एमबीबीएस (अॅलाेपॅथी), बीएएमएस (आयुर्वेद), बीएचएमएस (हाेमिआेपॅथी) व बीयूएमएस (युनानी) या चारच पॅथींना परवानगी अाहे. असे आढळल्यास कारवाई हाेते. नाशिक, त्र्यंबक, दिंडोरी व इगतपुरीच्या २१ जणांवर कारवाई झाली आहे.
- डॉ. कपिल आहेर, जिल्हा आरोग्य अधिकारी

फाैजदारी गुन्हा दाखल व्हावा
^ शल्यचिकित्सकांसह आरोग्य अधिकाऱ्यांनी डॉक्टरांमार्फत अशा बोगस डॉक्टरांचा शाेध घ्यावा. अशा बोगस डॉक्टरांवर गुन्हा दाखल करावा.
- धनंजय खांडगीर, उपाध्यक्ष, केमिस्ट असाे .

बातम्या आणखी आहेत...