आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनुकंपा नियुक्ती:सरकारी नोकरीच्या प्रतीक्षायादीत भावाच्या जागी बहिणीला संधी देण्यास मुंबई हायकोर्टाची परवानगी

नाशिक17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सरकारी नोकरीसाठी प्रतीक्षायादीत असणाऱ्या भावाच्या जागी बहिणीला संधी देण्यास मुंबई उच्च न्यायालायाने परवानगी दिली आहे.

न्यायमूर्ती रमेश धनुका आणि न्यायमूर्ती गौरी गोडसे यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.

नक्की प्रकरण काय?

नाशिक येथील तरुणीने भावाच्या संमतीने अनुकंपा तत्वावर सरकारी नोकरीसाठी प्रतीक्षायादीत भावाच्या ऐवजी स्वत:चे नाव बदली करण्याबाबत महापालिकेला विनंती केली होती. ही विनंती महापालिकेने शासन निर्णयाचा संदर्भ देत फेटाळली. याविरोधात शुभांगी कमोदकरने महापालिकेच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवर झालेल्या सुनावणीत हायकोर्टाने निकाल दिला.

नाशिक महापालिकेच्या प्रतीक्षा यादीत भावाच्या जागी याचिकाकर्त्या तरुणीचे नाव टाकण्यास नकार देण्याचे कोणतेही वैध कारण दिलेले नाही. अशा परिस्थितीत महापालिकेने अनुकंपा तत्वावरील सरकारी नोकरीच्या प्रतीक्षा यादीत शुभांगी कमोदकरचे नाव तिच्या भावाच्या जागी टाकण्याची प्रक्रिया पुढील चार आठवड्यात पूर्ण करावी असे स्पष्ट निर्देश महापालिकेला दिले.

शुभांगीचे वडील नाशिक महापालिकेत वरिष्ठ लिपिक म्हणून सेवेत होते. 21 एप्रील 2014 रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या जागी नोकरी मिळावी यासाठी शुभांगीच्या भावाने अर्ज केला होता. नंतर 2018 मध्ये पदवीधर झालेल्या शुभांगीने भावाच्या संमतीने 5 जून 2021 रोजी सरकारी नोकरीसाठीच्या प्रतीक्षा यादीत भावाच्या जागी स्वत:चे नाव टाकण्याची विनंती महापालिकेला केली. मात्र, पालिकेने अनुकंपा नियुक्तीच्या धोरणात उमेदवारीचा मृत्यू झाल्याशिवाय नाव बदलण्याची तरतूद नाही, असे सांगत शुभांगीची विनंती नाकारली होती. या निर्णयाला शुभांगीने आव्हान दिले होते.

काय म्हणाले कोर्ट?
खंडपीठाने प्रकरणाची गंभीर दखल घेत अनुकंपा तत्वासाखालील नियुक्तीसाठी भावाच्या जागी बहिणीचे नाव टाकण्यास परवानगी दिली असून ही प्रक्रीया पुढील चार आठवड्यात पूर्ण करावी असे स्पष्ट निर्देश महापालिकेला देण्यात आले आहेत.