आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

22 हजारांचा गंडा:कारची ऑनलाइन पद्धतीने बुकिंग करणे उपनिरीक्षकाला पडले चांगलेच महागात

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑनलाइन कार बुकिंग करण्यासाठी ‘रेन्ट अ कार’ या वेबसाइटवर काॅल केल्यानंतर अॅप डाऊनलोड करण्यास सांगून पोलिस उपनिरीक्षकाला डेबिट कार्डचा नंबर विचारत बँक खात्यातून २२ हजार रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात संशयित मोबाइलधारकाच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विकास वाघ (रा. तपोवन, द्वारका) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मुंबईला जाण्यासाठी कार बुक करण्यासाठी इंडियन ट्रॅव्हल नेट या संकेतस्थळावर लाॅगीन केले असता अनोळखी नंबरवरून फोन आला. संशयिताने कार बुकिंगसाठी इंडिया ट्रॅव्हल एपीके हे अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. डेबिट कार्डचा नंबर विचारून बँक खाते हॅक केले व ऑनलाइन रक्कम काढून घेतली.

बातम्या आणखी आहेत...