आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी पाठपुरावा:स्टार एअरच्या नाशिक-बेळगाव विमानसेवेचे बुकिंग पुन्हा सुरू

नाशिक5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्टार एअरने नाशिक-बेळगाव विमानसेवेचे बुकिंग पुन्हा सुरू केले असून ३ फेब्रुवारी २०२३ पासून ५० आसनी विमानाद्वारे, नाशिक-बेळगाव विमानसेवा होणार सुरू होणार आहे. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी उड्डाण योजने अंतर्गत विमानसेवा पुन्हा सुरू करण्याची मागणी केल्यानंतर केंद्रीय नागरी उड्डयनमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या निर्देशानुसार, स्टार एअरने विमानसेवेसाठी बुकिंग पुन्हा सुरू केली असल्याची माहिती उद्योजक मनीष रावल यांनी दिली. विशेष म्हणजे, बंद झालेल्या विमानसेवा सुरू करण्यासाठी भुजबळांच्या पाठपुराव्याला यश येत असताना व केंद्र अन‌् राज्यात सत्तेत असतानाही स्थानिक लाेकप्रतिनिधींचा केवळ पाठपुरावाच सुरू असल्याची चर्चा सुरू झाली आहे. भुजबळ यांनी सिंधिया यांच्याकडे विमानसेवेबाबत केलेल्या मागणीला यश आले असून ३ फेब्रुवारी २०२२ पासून स्टार एअरलाइन आठवड्यातील प्रत्येक शुक्रवार आणि रविवार असे दाेन दिवस नाशिक-बेळगाव विमानसेवा सुरू करणार आहे.

यापूर्वी मिळत हाेता ७५ ते ८० टक्के प्रतिसाद
संजय घाेडावत ग्रुपच्या स्टार एअरकडून उडान याेजनेंतर्गत नाशिक ते चिपी (सिंधुदुर्ग) आणि नाशिक-बेळगाव अशा दाेन मार्गांवर सेवा देण्याची बाेली जिंकली हाेती. मात्र, प्रत्यक्षात केवळ नाशिक-बेळगाव याच मार्गावर त्यांनी सेवा सुरू केली हाेती.

तिला ७५ ते ८० टक्के प्रवाशांचा प्रतिसाद मिळत हाेता. विशेष म्हणजे, सुरुवातीला आठवड्यातील तीन दिवस सेवा दिली जात हाेती, जी जुलै महिन्यानंतर दाेन दिवस केली गेली. काेल्हापूर, गाेवा, बेळगाव, धारवाड, मिरज या शहरांची कनेक्टिव्हिटी यातून मिळत असल्याने ही सेवा महत्त्वाची आहेे. स्टार एअरने सिंधुदुर्ग (चिपी) या मार्गावर सेवा सुरू केल्यास काेकण पर्यटनासाठी तिचा माेठा फायदा हाेणार आहे.

विमानसेवेचे वेळापत्रक असे
नाशिकहून शुक्रवारी सकाळी १०.४५ वाजता निघेल. ११.४५ ला बेळगाव येथे पोहाेचेल.
रविवारी सायं ६.३० वाजता उड्डाण करून सायं ७.३० वाजता बेळगावला पोहाेचेल.
बेळगावहून शुक्रवारी सकाळी ९.३० वाजता उड्डाण ते नाशिक येथे १०.३० वाजता पोहाेचेल.
रविवारी सायं. ५.०५ वा. उड्डाण आणि सायं. ६.०५ वा. नाशिकला पोहोचेल.

बातम्या आणखी आहेत...