आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शैक्षणिक साहित्याचे वाटप:सावित्री तर्फे १०० विद्यार्थ्यांना वह्या

नाशिक8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तंत्रज्ञानाच्या काळात आजही आदिवासी भागातील विद्यार्थी शैक्षणिक सुविधांपासून वंचित राहतात. यामुळे अनेक विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर जातात. याचा विचार करून सावित्री बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने १०० आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले गेले.

या विद्यार्थ्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी संस्थेने पुढाकार घेतला आहे. वासाळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील १०० विद्यार्थ्यांना पाटी, पेन्सिल, अंकलिपी, वह्या, चित्रकलेच्या वह्या देण्यात आल्या. पुढील काळात विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रमदेखील राबविले जाणार असल्याचे पदाधिकाऱ्यंानी स्पष्ट केले. संस्थेच्या अध्यक्षा स्वाती वानखेडे, सेक्रेटरी विजया राऊत उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...