आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षक दिन साजरा:विद्यार्थ्यांकडून उंटवाडी शाळेस ग्रंथ भेट

नाशिक23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाएसोच्या माध्यमिक विद्यालय उंटवाडी येथे शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी शाळेस ग्रंथ भेट दिले. मुख्याध्यापिका नंदिनी कहांडळ यांच्या अध्यक्षतेखाली शाळेत शिक्षक दिन साजरा झाला. कार्यक्रमाचे आयोजन विद्यालयाच्या सुनंदा कुलकर्णी, रवींद्र नाकील, मंगला मुसळे, संदीप भगरे यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांनी वर्गात अध्ययन करून शिक्षक म्हणून कार्य करण्याचा अनुभव घेतला. याप्रसंगी शालेय विद्यार्थी अनुष्का भालेराव, समीक्षा दाभाडे, जयेश निकम , वैष्णवी गवळी, श्रुती कार्ले आदींनी शिक्षक दिनाचे महत्त्व सांगितले. सूत्रसंचालन प्रांजल कुंभार, भावेश पाटील, पल्लवी काळोखे यांनी केले. आभारप्रदर्शन पल्लवी शिंदे, कृष्णा सुतार यांनी केले. संस्था उपाध्यक्ष तथा शालेय समिती अध्यक्ष चंद्रशेखर मोंढे यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी विद्यार्थी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...