आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्य अजिंक्यपद खो- खो स्पर्धा:महिला, पुरुष गटातील संघ जाहीर, दिदी ठाकरे, तर चेतन पवारची स्पर्धेसाठी निवड

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रोहा जिल्हा रायगड येथे कुमार आणि कुमारी गटाची राज्य अजिंक्यपद खो- खो स्पर्धा 8 ते 11 डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आली आहे.

रविवारी (4 डिसेंबरला) मुलींच्या संघाची कर्णधार म्हणुन श्रीराम विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाची खेळाडू हिची तर कुमार संघाचा कर्णधार म्हणुन अनु. आश्रमशाळा ठाणापडा, या संघाचा खेळाडू चेतन पवार याची निवड करण्यात आली आहे. आपल्या कामगिरीच्या जोरावर त्यांचेही निवड करण्यात आले आहे

मुलींचा संघ

वृषाली भोये, मनिषा पडेर, ऋतूजा सहारे, सुषमा चौधरी, दिपीका बोरसे, निशा वैजल, सोनाली पवार, तेजल सहारे, ताई पवार, सरीता दिवा, दिक्षा सिताड,ज्योती मेढे, जयश्री महाले, ललिता गोबाले

- मार्गदर्शक गीतांजली सावळे,व्यवस्थापक उमेश आटवणे

गतवर्षी नाशिकचा मुलींचा संघ हा उपविजेता होता. या संघात आठ राष्ट्रीय सुवर्ण पदक विजेत्या खेळाडूंचा समावेश आहे.

कुमार संघ

किरण जाधव, ओम कांगणे, चेतन चौधरी, कल्पेश सहारे, विजय शिंदे, चिंतामण चौधरी, गुलाब वाघमारे, जितेंद्र भोये, सुजल जाधव, हरिदास घटाले, ज्ञानेश्र्वर बोरसे, शाम भसरे, जीवन भोये, दिनेश कोहमकिरे

- मार्गदर्शक दिलीप खांडवी, व्यवस्थापक गौरव ढेमसे, रतन शर्मा.

कुमार गटाचे प्रशिक्षण शिबीर अनु. आश्रमशाळा ठाणापाडा येथे आयोजित करण्यात आले होते. कुमार गटातील खेळाडूंना शाळेचे मुख्याध्यापक श्री अशोक चौरे आणि अधिक्षक अरुण बागले यांच्या शुभहस्ते गणवेश वाटप करण्यात आले. तसेच स्पर्धेसाठी शुभेच्छा देखील देण्यात आल्या

दोन्ही संघ राज्य अजिंक्यपद स्पर्धेत नाशिकच्या लौकिकाला साजेशी अशी कामगिरी करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जिल्हा खो खो असोसिएशनचे अध्यक्ष विश्वास ठाकूर,खजिनदार सुनील गायकवाड व अन्य पदाधिकारी यांनी संघाला शुभेच्छा दिल्या.

बातम्या आणखी आहेत...