आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यतिथी महाेत्सव:ब्रह्मचैतन्य गाेंदवलेकर महाराज पुण्यतिथी महाेत्सव आजपासून

नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्री ब्रह्मचैतन्य महाराज गाेंदवलेकर यांच्या १०९ व्या पुण्यतिथी महाेत्सवानिमित्ताने बुधवार (दि. १४) पासून रविवार (दि. १८) पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयाेजन करण्यात आले आहे.

श्री सद‌्गुरू ब्रह्मचैतन्य महाराज गाेंदवलेकर उपासना मंदिर, निर्मला काॅन्व्हेंट शाळेसमाेर, गंगापूरराेड, नाशिक येथे हे कार्यक्रम हाेणार आहेत. दि. १४ राेजी दुपारी ४ ते सायं. ६ पर्यंत श्याम जाेशी व सहकारी श्री विष्णुसहस्त्रनाम सादर करतील. दि. १५ राेजी दुपारी ३ वाजता हरिपाठ, दि. १६ राेजी दुपारी ४ वा. भजन, दि. १७ राेजी दुपारी ४ वा. भजन, सायं. ६ तेे रात्री ८ कीर्तन, दि. १८ राेजी पहाटे ५ वाजता काकड आरती, दुपारी १२.३० वाजता महाप्रसाद, सायं. ४.३० वाजता भजन हाेईल.

बातम्या आणखी आहेत...