आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्र राज्य डायबेटीस असोसिएशनची सतरावी राज्य परिषद येत्या शुक्रवार (दि.३) पासून तीन दिवस नाशकात आयाेजित करण्यात आली आहे. या परिषदेत देशभरातील १ हजााराहून अधिक मधुमेह तज्ज्ञ सहभागी हाेणार असून नवनवीन उपचार पद्धती, संशाेधनावर मंथन करणार आहेत. विशेष म्हणजे, आंतराष्ट्रीय मधूमेह असाे.चे अध्यक्ष पद्मश्री डाॅ. शशांक जाेशी, राष्ट्रीय अध्यक्ष डाॅ.राकेश सहाय यांच्या उपस्थितीत शनिवारी (दि.४) थेट नागरिकांशी संवाद साधून उपचारांबाबत मार्गदर्शन करणार आहेत.
मधुमेह असोसिएशनची राज्य परिषद हाॅटेल एमराल्ड पार्क येथे होत असून या परिषदेत नवनवीन उपचार पध्दती, संशोधनवर ऊ हापोह केला जाणार असल्याची माहिती परिषद समितीचे अध्यक्ष डॉ. नारायण देवगांवकर व डॉ. समीर चंद्रात्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली. ३ फेब्रुवारी रोजी मधुमेहावर कार्यशाळा घेण्यात येणार आहे. दुसऱ्या दिवशी शनिवारी (दि. ४) दुपारी १२:३० वाजता परिषदेचे उद्घाटन आरोग्य, शिक्षण व संशोधन मुंबई संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्या हस्ते व प्रमुख पाहुणे म्हणून आमदार डॉ. राहुल आहेर, पद्मश्री डॉ. शशांक जोशी हे उपस्थित राहणार आहेत.
या परिषदेत पुढील विषयांवर तज्ञ मार्गदर्शन करतील. यात शुक्रवारी (दि. ३) डाॅ. ए. जी. उन्नीकृष्णन रुग्णाच्या रक्तशर्करेवरील उपायांवर, डॉ. शैला शेख स्थुलता निवारण यावर डॉ. संजय अग्रवाल शस्त्रक्रियेदरम्यान घ्यावयाची दक्षता यावर तर शनिवारी (दि. ४) मुंबई येथील डॉ. विजय पणीवर हे औषधोपचारांचे महत्त्व व नव्या उपचार पध्दती यावर आणि पद्मश्री डॉ. शशांक जोशी हे कृत्रिम बौध्दिक क्षमता याविषयी मार्गदर्शन करणार आहेत.
डॉ. पार्थ देवगांवकर पद्व्युत्तर वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजूषा घेणार आहेत. रविवारी (दि. ५) परिषदेच्या समारोपाला अहमदाबाद येथील डॉ. बन्सी साबू, डॉ. अमित गुप्ता, डॉ. एच. बी.चंडालिया उपस््थित राहणार आहेत. परिषदेच्या यशस्वितेसाठी समितीचे डॉ. यशपाल गोगटे, डॉ. समीर शहा, डॉ. राजश्री पाटील,डाॅ. विनाेद चाैधरी, डॉ. मृणालिनी केळकर, डॉ. राहुल पाटील, डॉ. विजय धोंडगे, डॉ. समीर पेखळे प्रयत्नीशल आहेत.
तज्ज्ञांकडून मार्गदर्शन
शुक्रवारी (दि. ३) सायंकाळी ६ वा., शंकराचार्य न्यास, कुर्तकोटी सभागृह, गंगापूर रोड, येथे प्रसिध्द मधुमेह तज्ञ डॉ. विजय पणिकर (मुंबई) व पद्मश्री डॉ. शशांक जोशी, डॉ. नारायण देवगावकर, आहारतज्ञ डॉ. रश्मी मधोळकर सेठी हे रुग्णांना मधुमेहाबाबत मार्गदर्शन करतील. शनिवारी (दि. ४) सकाळी ६.३० वा. गेाल्फ क्लब मैदानावर माेफत लाईफ सपाेर्ट सिस्टीमचे प्रात्यक्षिक दाखविले जाईल. एखाद्यास हृदयविकाराचा झटका आल्यास त्यास जागेवरच रूग्णाला श्वास घेण्यासाठी मदत कशी करावी हे यात दाखविले जाईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.