आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंतिम मुदत:11 वी प्रवेशासाठी शाखा निवड; आज अंतिम संधी

नाशिक15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकरावी प्रवेशाच्या तीन नियमित फेऱ्या व एक विशेष फेरी होऊनही अनेक विद्यार्थ्यांना पसंतीचे काॅलेज व शाखा मिळू शकली नाही. या फेरीत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा भाग एक व दोन यामध्ये बदल करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे पसंतीचे काॅलेज व शाखा निवडण्यासाठी विद्यार्थ्यांना रविवार (दि. ११) ही अंतिम मुदत असेल.

अनेक विद्यार्थ्यांनी अजूनही प्रवेश घेतलेला नाही. प्रवेशाच्या प्रतीक्षेत असलेल्या अशा सुमारे सात ते आठ हजार विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभागाने दुसरी विशेष फेरी राबविण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांत अकरावीच्या कला, वाणिज्य, विज्ञान व संयुक्त शाखा मिळून सुमारे ९ हजार जागा रिक्त असल्याने विद्यार्थ्यांना या जागांवर प्रवेश मिळू शकेल.दुसऱ्या विशेष फेरीसाठी ९ ते ११ सप्टेंबर या कालावधीत नवीन अर्ज भरण्यासह भाग दोन अंतर्गत पसंतीक्रम बदलता येईल. तर १५ सप्टेंबरला दुसऱ्या फेरीसाठी गुणवत्ता यादी जाहीर होईल. त्यानंतर निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी १७ सप्टेंबरपर्यंत मुदत असेल. १८ सप्टेंबरला रिक्त जागांचा तपशील जाहीर होईल. एटीकेटी सवलत मिळालेले विद्यार्थीही या फेरीमध्ये सहभागी होऊ शकतील. त्यांना आपले सहा विषयांमध्ये मिळालेले ६०० पैकी गुण नोंदवावे लागतील. विद्यार्थ्यांनी आपले अर्ज वेळेत भरून लाॅक करावेत. सर्व विद्यार्थ्यांचे भाग दोन अनलाॅक करण्यात आलेले आहेत.

बातम्या आणखी आहेत...