आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:सर्दीवर ब्रँडीचा उपचार; प्राध्यापक कारागृहात

नाशिक12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बेदरकारपणे कार चालवत दुचाकीचालकांना उडविणाऱ्या प्राध्यापकाची मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. सर्दी-खोकला जात नसल्याने ब्रँडी पिण्याचा सल्ला कुणीतरी दिला आणि कधी सुपारीदेखील न खाणाऱ्या प्राध्यापकाने थेट पाण्यासारखी ब्रँडी प्राशन केली व त्यानंतर नशेत कार चालवत तीन जणांना धडक दिली. हा सल्ला प्राध्यापकाच्या करिअरवर बेतला असून यामुळे त्याला नोकरीदेखील गमवावी लागली आहे.

नाशिकरोड येथील महाविद्यालयात काॅमर्स शाखेचे प्राध्यापक असलेले संशयित साहेबराव निकम यांना सर्दी-खोकल्याचा त्रास होता. सर्दी कमी होत नसल्याने कुणीतरी त्यांना ब्रँडी घेण्याचा सल्ला दिला. काॅलेज सुटल्यानंतर कारमध्ये त्यांनी ब्रँडीची बाटलीच खाली केली.

प्रथमच मद्य प्राशन केल्याने त्यांची शुद्ध हरपली. याच स्थितीत कार चालवत उपनगरनाका येथे एकाला धडक दिली. भीतीपोटी कार वेगात चालवल्यानंतर दुभाजकाला धडक दिली. कारचे समोरील टायर फुटले तरी कार वेगात चालवत तीन दुचाकीना धडक दिली. यात एकाचे दोन्ही पाय निकामी झाले. संशयिताविरोधात मुंबईनाका पोलिसात गुन्हा दाखल केला. न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...