आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाच टक्के निधी राखीव:महिला बालकल्याणच्या निधी पळवापळवीला ब्रेक; शासनाकडून योजनानिहाय आराखडा निश्चित

नाशिक4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दरवर्षी महापालिकेच्या माध्यमातून महिला व युवतीसह बालकांकरिता राखीव असलेल्या निधीची पळवापळवी होत असल्याचे बघून अखेर राज्य शासनाने शहरी भागातील महिला व बालकांच्या विकासासाठी कुठल्या योजना राबवाव्यात यासंदर्भातील योजनानिहाय आराखडाच निश्चित केला आहे. त्यानुसार खर्च करण्याचे बंधन आयुक्तांवर टाकल्यामुळे महिला व बालकल्याण विभागाचा निधी पळवणे अवघड ठरणार आहे.

पालिकेच्या अंदाजपत्रकातील ५ टक्के निधी हा शहरी भागातील महिला व मुलांच्या विकासासाठी राखीव असून महापालिका कायद्यातील तरतुदींनुसार अंदाजपत्रकातील वार्षिक महसुली उत्पन्नातून बांधिल खर्च वजा जाता उर्वरित रकमेच्या पाच टक्के निधी महिला व बालकांच्या कल्याणकारी योजनांसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. मात्र दरवर्षी हा निधी पळवापळवी होत असल,यामुळे महिला सदस्यांना आवाज उठवावा लागतो.

महिला व बालकांना फायदेशीर योजनाच तयार होत नसल्याचे चित्र राज्यातील बहुतांश महापालिकेत असल्याचे शासनाच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी ठोस नियंत्रण प्रस्थापित केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून महिला व बालकल्याण विभागाने राबवयाच्या योजनांचा आराखडा निश्चित करत त्यानुसारच निधी खर्चाचे दंडक घातले आहे. प्रामुख्याने महिला व बालकल्याणासाठी अंदाजपत्रकातील राखीव ५ टक्के तरतूद ही किमान मर्यादा असून त्यापेक्षाही अधिक खर्चाची मुभा दिली आहे. योजना राबविण्याचे अधिकार आयुक्तांना देण्यात आले आहेत. मात्र त्यासाठी महिला व बालकल्याण समितीची मंजुरी आवश्यक असणार आहे.

बातम्या आणखी आहेत...