आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्र जुदो असोसिएशन आणि कोल्हापूर जिल्हा जुदो असोसिएशन यांच्या वतीने कोल्हापूर येथे 49 व्या ज्यूनीयर गटाच्या आणि वरिष्ठ गटाच्या राज्य अजिंक्यपद स्पर्धा आणि निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांच्या 212 खेळाडूनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेत सहभागी झालेल्या नाशिकच्या खेळाडूनी चांगल्या खेळाचे प्रदर्शन करून घवघवीत यश संपादन केले.
नाशिकच्या वैष्णवी खलानेने 52 किलो वजनी गटात सुंदर कामगिरी करून सुवर्णपदक पटकावले. तर दिव्या कर्डेलने 78 किली वजनी गटात अंतिम लढतीत सुंदर खेळ करून सुवर्ण पदक मिळविले. आकांक्षा शिंदेने ४८ किलो वजनी गटात अंतिम फेरीत चांगला खेळ केला परंतु तिला एक गुणांच्या फरकामुळे रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. तनुजा वाघनेही चांगला खेळ करत 70 किलो वजनी गटात रौप्य पदकाची कामाई केली. नाशिकच्या खेळाडूच्या या कामगिरीमुळे दिव्या कर्डेल आणि वैष्णवी खलाने यांची महाराष्ट्राच्या संघामध्ये निवड झाली आहे. दिनांक 16 ते 20 डिसेंबर, 2022 दरम्यान रांची येथे आयोजित राष्ट्रीय स्पर्धेत या खेळाडू महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतील. या राज्य स्पर्धेत सहभागी झालेल्या नाशिकच्या विरेन्द्र शिंदे, पृथ्वीराज राहणे, आयुष विघे, मृणली जोशी यांनीही चांगला खेळ केला. परंतु त्यांना पदकापर्यंत मजल मारता आली नाही. अजिंक्य वैद्य आणि गौरव पगारे यांनी संघ व्यवस्थापक म्हणून जबाबदारी पार पाडली.
विद्यापीठ स्पर्धेतही नाशिकची सुंदर कामगीरी
नाशिक विभागाच्या आंतर महाविद्यालयीन जुदो स्पर्धेत आकांक्षा शिंदेने 48 किलो वजनी गटात, करुणा थत्तेकरनेने 52 किलो गटात तर दिव्या कर्डेलने 78 किली वजनी गटात सहज विजय मिळवत सुवर्णपदके पटकावली. या सुवर्ण कामगिरीमुळे या तीनही खेळाडूंची पुणे विद्यापीठाच्या संघामध्ये निवड झाली आहे. नाशिकच्या या खेळाडूंना प्रशिक्षक विजय पाटील आणि योगेश शिंदे यांचे मार्गदर्शन मिळत आहे. नाशिकच्या खेळाडूंच्या या सुवर्ण कामगिरी ची दखल घेऊन या खेळाडूंचे जेष्ठ क्रीडा संघटक तथा जिल्हा सचिव डॉ. रत्नाकर पटवर्धन, यशवंत व्यायाम शाळेचे अध्यक्ष दिपक पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिळे, राज्य जुदो असोसिएशनचे खजिनदार रवींद्र मेतकर, माधव भट, भगवान दराडे, स्वाती कणसे यांनी अभिनंदन करून राष्ट्रीय स्पर्धा आणि अखिल भारतीय विद्यापीठ स्पर्धेसाठी शुभेच्या दिल्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.