आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासातशे काेटींच्या आसपास असलेले जुने देणे, सातवा वेतन आयाेग यामुळे प्रशासकीय खर्चात झालेली वाढ, काेराेनामुळे पाणीपट्टी व नगररचना विभागाचा आटलेला महसूल तसेच ४०० काेटींची बीआेटी याेजना कागदावरच राहील्यामुळे शुक्रवारी (दि. ३) सादर हाेणाऱ्या महापालिकेच्या २०२२-२३ या आर्थिक वर्षाचे सुधारित व २०२३-२४ च्या प्रारूप अंदाजपत्रकात अपवादात्मकच नवीन कामांना संधी मिळणार आहे. रात्री उशिरापर्यंत प्रमुख अधिकारी नवीन कामांना कशी संधी मिळेल याचे नियाेजन करताना दिसत हाेते.
रस्ते, पाणी, गटार, उद्यान अशा विविध भांडवली कामांसाठी जवळपास अडीच हजार कोटींचे प्रस्ताव बांधकाम विभागाकडे आले असले तरी, गेल्या दोन वर्षातील दायित्वामुळे या विभागासाठी शंभर कोटीच्या आतच रक्कम मिळणार असल्यामुळे काेणाला न्याय द्यायचा असाही प्रश्न आहे. दरवर्षी २८ फेब्रुवारीपुर्वी पुढील अर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक आयुक्तांकडून मंजुरीसाठी स्थायी समितीवर येते. यंदा मात्र, प्रशासकीय राजवट असल्यामुळे आयुक्तांकडेच स्थायी व महासभेचे अधिकार आले आहे.
त्यामुळे आयुक्त हे स्वत:च स्वत:च्या मंजुरीसाठी अंदाजपत्रक सादर करतील.गेल्यावर्षी तत्कालीन आयुक्तांनी २,२२७ कोटींचे प्रारूप अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर केले होते. स्थायी समितीने या अंदाजपत्रकात ३३९ कोटी ९७ लाखांची भर घालत हा आकडा २,५६७ कोटींवर पोहोचला होता. त्यावेळी इलेक्शन एअर असल्यामुळे भरमसाठ निधीची लयलुट विविध विकासमांसाठी करण्यात आली हाेती. प्रत्यक्षात, ही कामे मार्गी लावण्यासाठी अपेक्षित उत्पन्न चालू वर्षात उपलब्ध झाले नाही.
घरपट्टीत विक्रमी १५८ काेटीची वसुली झाली खरी मात्र बीआेटीचे चारशे काेटी तसेच पाणीपट्टीत साधारण ३० काेटीची थकबाकी आहे. ही बाब लक्षात घेत पुढील वर्षाच्या अंदाजपत्रकात आयुक्तांनी सावध पवित्रा घेत ताकही फुंकून पिण्याचा निर्णय घेतला. त्याचा परिणाम म्हणून नवीन विकासकामांसाठी फारशी माेठी संधी उपलब्ध हाेणार नसल्याचे चित्र आहे.
पालिकेची आर्थिक स्थिती नाजूक; केवळ गरजेची कामे
महापालिकेची आर्थिक परिस्थिती नाजूक असून प्रशासकीय खर्चामध्येझालेली वाढ,सातवा वेतनआयोगाचा बोजाबघता नवीनविकास कामांसाठीफारशी तरतूद करणे सध्यातरी पालिकेला शक्य नाही. मात्र त्यानंतरही अत्यावश्यक कामांसाठी आर्थिक नियोजन करून तरतूद केली जात आहे. शुक्रवारी अंदाजपत्रक सादर हाेईल. - डाॅ. चंद्रकांत पुलकुंडवार, आयुक्त, महापालिका, नाशिक
बांधकाम विभागाची काेंडी ; तीन हजार काेटीचे प्रस्ताव
शहराचा चाैफेर विकास हाेत असून प्रामुख्याने रस्त्यांच्या कामांसाठी माेठ्या प्रमाणात निधीची गरज भासते. मागील तीन वर्षात निव्वळ रस्त्यापाेटी सरासरी २०० काेटी याप्रमाणे सहाशे काेटी खर्च झाला आहे. ही बाब लक्षात घेत यंदा भांडवली कामांसाठी तीन हजार कोटींचे प्रस्ताव आल्याचे सांगितले जाते. तुलनेत जेमतेम शंभर काेटी रूपयेचबांधकाम विभागाला मिळू शकतात. दरम्यान, माजी नगरसेवकांचा यामुळे राेष येण्याची भिती लक्षात घेत, आयुक्तांनी अंदाजपत्रक अंतिम करण्यापुर्वीमा ेठी हिमंत दाखवत शंभर काेटीचीनवीन कामे कशी मंजुर करता येईल यादृष्टीकाेनातून प्रयत्न सुरू केल्याचे सांगितले जात हाेते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.