आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सापडली:पालिकेत नोकरभरतीचा बिगूल; अखेर सेवा नियमावली सापडली

नाशिक15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एकीकडे झपाट्याने वाढणारे शहर व त्यादृष्टीने पालक संस्था म्हणून मूलभूत सुविधा पुरविण्यात पालिकेला अपुऱ्या मनुष्यबळामुळे येत असलेल्या अडचणीतून अखेर मुक्तता होणार असून २०१७ पासून राज्याच्या नगरविकास विभागाकडे पडून असलेली सेवा प्रवेश नियमावली व बिंदुनामावलीची फाइल अखेर सापडली आहे. त्यामुळे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामार्फत पुढील आठ दिवसांत त्यास मान्यता मिळण्याची शक्यता असून तसे झाले तर नोकरभरतीचा बिगुल वाजणार आहे. आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर पहिल्या दिवसापासून रमेश पवार यांनी नोकरभरतीसाठी धडपड सुरू केली. त्याची दखल घेत नगरविकासमंत्र्यांचे ओएसडी बालाजी खतगावकर यांनी युद्धपातळीवर हालचाली करून फाइल मिळवल्यामुळे समाधान व्यक्त होत आहे. नाशिक महापालिकेची ‘क’ वर्गातून ‘ब’ वर्गात पदाेन्नती झाली असून ‘ब’ वर्गानुसार महापालिकेने १४ हजार अधिकारी .

अग्निशामक, वैद्यकीय, इंजिनिअर या पदांची भरती होणार पहिल्या टप्प्यात आरोग्यसेवेतील ३४८ पदांबाबत आस्थापना खर्चाची अट शिथिल केली होती. त्यानुसार अग्निशमन, वैद्यकीय तसेच सार्वजनिक बांधकाम, नगररचना विभागातील आवश्यक ५२७ जागांची माहिती मागवली होती. ती पाठवल्यानंतर सेवा प्रवेश नियमावली मंजूर नसल्याने भरतीत झालेला खाेळंबा दूर झाला आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात अग्निशामक, वैद्यकीय व इंजिनिअरची भरती होईल अशी माहिती आयुक्तांनी दिली.

अग्निशामक, वैद्यकीय, इंजिनिअर या पदांची भरती होणार
पहिल्या टप्प्यात आरोग्यसेवेतील ३४८ पदांबाबत आस्थापना खर्चाची अट शिथिल केली होती. त्यानुसार अग्निशमन, वैद्यकीय तसेच सार्वजनिक बांधकाम, नगररचना विभागातील आवश्यक ५२७ जागांची माहिती मागवली होती. ती पाठवल्यानंतर सेवा प्रवेश नियमावली मंजूर नसल्याने भरतीत झालेला खोळंबा दूर झाला आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात अग्निशामक, वैद्यकीय व इंजिनिअरची भरती होईल अशी माहिती आयुक्तांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...