आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिक रन चॅरिटेबल ट्रस्टने नाशिक जिल्ह्यातील आदिवासी भागातील शाळा व वसतिगृहासाठी आर्थिक मदतीचा हात देत सामाजिक बांधिलकी जोपासली आली आहे. या शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारावा, यासाठी शाळांमध्ये विविध उपक्रम राबविले जात आहे. वसतिगृहांतील सुविधांचा फायदा एक हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना होत आहे. शैक्षणिक विकासासाठी पोषक वातावरण तयार होत असल्याने संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा गुणवत्तेचा आलेख सुधारत आहे. डांग सेवा मंडळाच्या कळवण येथील आश्रमशाळेत आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते.
आदिवासी मुले व मुलींकरता सुविधा पुरविण्यात जात असून मुलींच्या वसतिगृहाची प्रचंड दुर्दशा झाली होती. विद्यार्थिनींची होणारी कुचंबना लक्षात घेऊन नाशिक रनतर्फे मुले व मुलींच्या वसतिगृहाचे नवीन बांधकाम करून देण्यात आले. त्याचा फायदा ४०० विद्यार्थ्यांना झाला. दुसऱ्या प्रकल्पात डांग सेवा मंडळाच्या पेठ येथील आश्रमशाळेत नाशिक रनद्वारे नवीन बांधकाम करण्यात आले त्याचा ५० विद्यार्थ्यांना लाभ झाला. तिसऱ्या प्रकल्पात श्री गाडगे महाराज आश्रमशाळा , बेरवळ येथे आश्रम शाळेद्वारे आदिवासी विद्यार्थ्यांकरता निवासी शिक्षण पुरविण्यात येते.
अन् विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा आलेख सुधारला
संत ज्ञानेश्वर विद्यालयात वर्ग खोल्या बांधण्यास मदत करण्यात आली आहे. या शाळेत ७५० पेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. नाशिक रनद्वारे या शाळेत स्वच्छतागृह, संरक्षित भिंत तसेच विविध पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. शिक्षकांनीही गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर देत विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली. या शाळेतील अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात यशाचे शिखर गाठत आहे. शाळेतील गुणवत्तेचा आलेखही वाढला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.