आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरी:घरफोडीत पाच लाखांच्या दागिन्यांसह बुलेटची चोरी

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बंद घराचे कुलूप तोडून घरातील सोन्याचांदीचे दागिने आणि घराच्या बाहेर उभी असलेली बुलेट दुचाकी चोरी केल्याचा प्रकार तिरुपती बंगलो, गणेश काॅलनी, दसक, जेलरोड येथे उघडकीस आला. उपनगर पोलिस ठाण्यातत घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेली माहिती आणि राहुल डगळे रा. जेलरोड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते परिवारासह नातेवाइकांच्या घरी गेले होते. घराला कुलूप आणि सेफ्टी डोअर लावले होते. चोरांनी दरवाजाचे कुलूप आणि सेफ्टी डोअरचे आॅटो लाॅक तोडून घरात प्रवेश केला. कपाटात ठेवलेले १५७ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि ४३ ग्रॅम चांदीचे दागिने चोरी केले.

एवढ्यावरच न थांबता चोरांनी घरातील सर्व साहित्य अस्थाव्यस्त करत आणखी काही मिळते का याचा शोध घेतला. भरवस्तीमध्ये हा प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वरिष्ठ निरीक्षक नीलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

सीसीटीव्हीचा डीव्हीआर केला चोरी : चोरांनी घरफोडी केल्यानंतर सीसीटीव्हीचा डीव्हीआर चोरी केला. जाताना घराच्या बाहेर लावलेली बुलेट घरात ठेवलेल्या चावीच्या साह्याने एमएच १५ जीबी ५६०६ चोरी करून नेली.

बातम्या आणखी आहेत...