आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लंपास:श्रमिकनगरला सराफाचे दुकान फोडले; दोन किलो चांदी लंपास

सातपूर14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लव्हाटेनगर येथे दोन महिन्यांपूर्वी लहान मुलास ओलीस धरून भरदिवसा टाकलेल्या सशस्त्र दरोड्याचा तपास लावण्यात अपयशी ठरलेल्या सातपूर पोलिसांना दरोडेखोरांनी पुन्हा झटका दिला. शनिवारी मध्यरात्री श्रमिकनगरातील श्रीहरी ज्वेलर्स नावाने असलेल्या सराफाचे दुकान फोडून चोरट्यांनी सव्वादोन किलो चांदी लंपास केली. सुदैवाने तिजोरी फोडण्यात चोरट्यांना अपयश आल्याने सोन्याचे मौल्यवान दागिने त्यांच्या हाती लागले नाही.

रविवारी सकाळीच ही बाब पोलिसांना कळवण्यात आली मात्र रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी गुन्हा दाखल केला नव्हता. मिळालेल्या माहितीनुसार, पांडुरंग शहाणे (रा. ध्रुवनगर, शिवाजीनगर ) यांचे श्रमिकनगरातील श्री हरी ज्वेलर्स हे दुकान शनिवारी रात्री फोडण्यात आले. रविवारी सकाळी दुकानाचे शटर तोडलेले दिसल्याचे परिसरातील नागरिकांनी शहाणे यांना कळविले. शहाणे यांनी त्वरीत सातपूर पोलिसांना दुकानातील सव्वा दोन किलो चांदीचे घडवलेले ऐवज व इतर किरकोळ साहित्य चोरीस गेल्याची माहिती दिली. दुकानातील तिजोरी छन्नी व हातोडाने फोडण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे दिसून आले. वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर सातपूर भागात रात्रीचे कॉम्बिग ऑपरेशन देखील कागदोपत्रीच राबवले जात आहे.

ठाण्यात तडजोडीवर भर
सातपूर पोलिस ठाण्यात तक्रार करण्यास गेल्यानंतर गुन्हा दाखल करण्याऐवजी आर्थिक तडजोड करण्यावरच भर दिला जात असल्याचा अनुभव तक्रारदारांना येत आहे. सायकल चोरांपासून उद्यानातील प्लास्टिक चोरणाऱ्या चोरटयांना नागरिकांनी पकडून स्वाधीन केले मात्र पोलिसांनी त्यांना सोडून दिल्याचा अनुभव नागरिकांना आला.

बातम्या आणखी आहेत...