आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओझरमधील बैलगाडा शर्यत रद्द:लम्पीच्या प्रादुर्भावामुळे ग्रामस्थांचा निर्णय, खंडोबा यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यत परंपरा खंडित

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ओझरमध्ये आयोजित केलेली बैलगाडा शर्यत आता रद्द करण्यात आली आहे. लम्पी आजाराच्या प्रादुर्भावामुळे ही शर्यत रद्द करण्याचा निर्णय ग्रामस्थानी घेतला. प्रादुर्भाव आटोक्यात आल्यानंतर यावर विचार केला जाणार आल्याचे सांगण्यात येत आहे.

परिसरात खंडोबा यात्रेच्या निमित्ताने बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात येते. खंडोबाची यात्रा पार पडल्यानंतर दुसऱ्या दिवशी मोठ्या जल्लोषात राज्यभरातून बैलगाडाशर्यत प्रेमी ओझरमध्ये दाखल होतात. मात्र, राज्यासह जिल्ह्यात लम्पी आजाराचा प्रादुर्भाव आहे, त्यामुळे खंडोबा यात्रेनिमित्त होणारी शर्यत आता रद्द करण्यात आली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून राज्यभरात लम्पिचा प्रादुर्भाव असून यासाठी पशु संवर्धन विभागाकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. याच प्रादुर्भावाचा विचार करता प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी बैलगाडा शर्यत रद्द करण्याचा निर्णय झाला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून लम्पि आजाराने अनेक जनावरांचा मृत्यू झालेला आहे. ही साथ फोफावत असल्याने ओझर परिसरातील सर्व ग्रामस्थांनी आयोजकांनी बैलगाडा शर्यत रद्द करण्याचा निर्णय एक मुखाने घेतलेला आहे. जोपर्यंत लम्पीची साथ कमी होत नाही, तोपर्यंत पुन्हा बैलगाडा शर्यत चे आयोजन करण्यात येणार नाही, त्यामुळे सध्या तरी ही बैलगाडा शर्यत तात्पुरती रद्द करण्यात आलेली आहे. जोपर्यंत संपूर्ण लम्पी आजाराचा नायनाट होत नाही, तोपर्यंत शर्यत बंद राहणार आहे, त्यानंतर पुन्हा एकदा नव्या जोमाने की यात्रा घेतली जाणार आहे.

ही बैलगाडी शर्यत ऐनवेळी रद्द करण्यात आल्यामुळे राज्यभरातून शर्यतीसाठी आलेल्या व शरद बघण्यासाठी आतुर असलेल्या शेतकरी व बांधवांना शर्यत रद्द झाल्यामुळे उत्साहाच्या विरजन पडले.

दरवर्षी चंपाषष्ठी निमित्ताने ओझर येथे खंडोबाची मोठी यात्रा 12 गाड्या ओढण्याचा कार्यक्रम घेण्यात येतो या यात्रेसाठी केवळ नाशिक जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यभरातील व शहराच्या मध्य प्रदेश आणि राजस्थान भागातून यात्रेसाठी भाविक येत असतात. यंदा करोनाच्या चावट नंतर पहिल्यांदाच मोठी यात्रा झाल्याने उत्साह संचारला होता.

बातम्या आणखी आहेत...