आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बसची दुचाकीला धडक:सेवानिवृत्त पोलिस कर्मचाऱ्याचा अपघातात मृत्यू; नाशिकच्या क्रांती नगर येथील घटना

नाशिक12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भरधाव वेगात जाणाऱ्या बस आणि दुचाकीच्या अपघातात सेवानिवृत्त पोलिस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (16 जून) दुपारी 1 वाजता क्रांतीनगर पीरबाबा दर्ग्यासमोर घडली. पंचवटी पोलिस ठाण्यात बसचालकाविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिलीप विक्रमसिंग वळवी असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

मृत दिलीप विक्रमसिंग वळवी
मृत दिलीप विक्रमसिंग वळवी

कसा झाला अपघात

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ​​​​​मखमलाबाद शिवारा राहणारे दिलीप विक्रमसिंग वळवी (वय 58) हे दुचाकीने क्रांतीनगर येथून जात असतांना मखमलाबाद रोडवरील पिरबाबा दर्गा समोर खासगी बसने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत वळवी बसच्या मागील चाकाखाली आल्याने त्यांच्या डोक्याला जबर मार लागला व त्यातच त्यांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत वळवी यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच डाॅक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. अपघाताची माहिती कुटुबियांना कळवण्यात आली. रुग्णालयात कुटुंबियांनी एकच आक्रोश केला. या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात बसचालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ निरिक्षक डाॅ. सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

वळवी क्रीडापटू

वळवी पोलिस दलातून नोव्हेंबर 2021 ला सेवानिवृत्त झाले आहे. दलात असताना ते क्रीडा क्षेत्रात सहभागी होत. पोलिस संघाकडून ते व्हाॅलिबाॅल खेळत होते. राज्यस्तरीय स्पर्धेत त्यांचा संघात सहभाग होता. त्यांच्या निधनाची बातमी समजताच सहकारी पोलिस कर्मचाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेत नातेवाईकांचे सांत्वन केले.

बातम्या आणखी आहेत...