आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:बसने दुचाकीला धडक दिल्याने चालक ठार; के.के.वाघ कॉलेज जवळील घटना, पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भरधान वेगाने जाणाऱ्या बसने दुचाकी चालकाला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकी चालक ठार झाला. रविवार दि. 5 रोजी दुपारी 2.30 वाजता के.के.वाघ महाविद्यालयाच्या समोर हा अपघात घडला. बस चालकाच्या विरोधात पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयुर बाळू भोसले ( वय 25 रा. बिडी कामगार नगर अमृतधाम ) हे दुचाकी एमएच 15 बीआर 1143 ने द्वारकाकडून येऊन उड्डाणपुलाच्या खालून के.के.वाघ महाविद्यालयाकडे वळण घेत असतांना धुळे बाजुकडून येणारी शिरपुर-जव्हार एमएच 13 सी.यु.6910 या बसने दुचाकीला धडक दिली. या धडकेत भोसले यांच्या डोक्यास गंभीर मार लागला त्यांना नजीकच्या खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाला. पंचवटी पोलिस ठाण्यात बस चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...