आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रसंगावधान:चालकाच्या सतर्कतेने टळली बसची आग

चांदवडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

चालकाच्या प्रसंगावधानामुळे बसला आग लागण्यापासून वाचवण्यात यश आल्याची घटना येथील महामार्ग चौफुलीवर घडली.नांदगाव आगाराची बस नांदगाव येथून नाशिककडे जात असताना चांदवड येथील मुंबई-आग्रा महामार्ग चौफुली येथे बसच्या कॅबिनमध्ये अचानक शॉर्टसर्किट होऊन मोठ्या प्रमाणात धूर व आग निघत असल्याचे बसचालकाच्या लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान राखत बस रस्त्याच्या बाजूला उभी केली.

त्याचवेळी रस्त्याच्या बाजूला असलेल्या शिवसेनेच्या वाहतूक सेनेचे अकबरभाई, त्यांचा मुलगा व सहकाऱ्यांनी तत्काळ पाण्याच्या बादल्या भरत बसमधील आग विझवली. यावेळी अकबरभाई यांनी चांदवड येथील टोलनाका पेट्रोलिंग कंट्रोलला संपर्क साधून अग्निशामक बंबलाही सूचना दिली. बस चालक व अकबरभाई यांनी तात्काळ धावपळ करत बसमधील सर्व प्रवाशांना खाली उतरत होणाऱ्या संभाव्य धोक्यापासून नागरिकांचे व बसचे नुकसान वाचवले.

बातम्या आणखी आहेत...