आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ:बस पाण्यात, 35 प्रवाशांची सुटका

नाशिक24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दोन दिवसांपासून शहरात सुरू असलेल्या पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ झाली आहे. शुक्रवारी (दि. २) दुपारी अडीचच्या सुमारास गाेदाघात परिसरात बाहेरगावहून आलेली बस वाहत गेली व पुढे गाडगेमहाराज पुलाखाली अडकली. गाेदापात्रातील पाण्याचा अदाज न आल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने ही घटना घडली. ही बाब लक्षात येताच तत्काळ मदतकार्य राबवत बसमधील ३५ प्रवाशांना सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यात आले. तीन तासांच्या प्रयत्नानंतर ही बस पाण्याबाहेर काढण्यात यश आले.

जीवरक्षकांच्या मदतीने पुलाखाली अडकलेल्या बसमधील सर्व प्रवाशांना सुरक्षितरीत्या बाहेर काढले. तीन तासाच्या प्रयत्नानंतर ही बस पाण्याबाहेर काढण्यात आली. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे गंगापूर धरणातून मोठा विसर्ग करण्यात आल्याने गाेदावरीच्या पातळीत मोठी वाढ झाली होती. गोदाकाठावरील नागरिकांना प्रशासनांकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला हाेता. तर गोदावरी नदीला येणाऱ्या पुराचा इंडिकेटर म्हणून मानला जाणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी आले होते. शुक्रवारी सकाळपासूने ऊन पडली होती. तसेच, नदीची पाणी पातळीही सायंकाळपर्यंत खाली आली होती.

जीवरक्षकांकडून तत्काळ धाव घेत मदत
दाेन दिवस झालेल्या जाेरदार पावसामुळे गाेदावरीच्या पाणी पातळीत वाढ झाली हाेती. गाेदापात्रातील या पाण्याचा अंदाज न आल्याने वाहकांचे नियंत्रण सुटल्याने बस शुक्रवारी बस पाण्यात वाहून जात असल्याचे दिसताच गोदाघाट परिसरातील जीवरक्षकांनी तातडीने बसकडे धाव घेतली. बसमधील प्रवाशांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. चालण्यास त्रास हाेणाऱ्या काही ज्येष्ठांना खांद्यावर घेत सुखरूप बाहेर काढण्यात आले. जीवरक्षकांच्या मदतीमुळे काही वेळेतच बसमधील सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...