आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक:नाशिकच्या चिखलीत बस पिकअपची धडक; 4 ठार

नाशिक20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वणी-बोरगाव-सापुतारा रस्त्यावरील चिखली (ता. सुरगाणा) येथे वणीकडून सापुताराकडे जाणारी लक्झरी बस (आरजे २७ पीबी २६५८) व बोरगावकडून नाशिककडे वालपापडी घेऊन जाणारी पिकअपची (एमएच ४१ एयू २१९२) समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात पिकअपमधील ४ जण ठार झाले.

कैलास पांडुरंग दळवी (२६, रा. तताणी, ता. कळवण), पंढरीनाथ मुरलीधर भोये (५५, रा. शृंगारवाडी, ता. कळवण), नारायण देवराम पवार (५०, रा. घागरबुडा, ता. सुरगाणा) हे तीन जण जागीच ठार झाले. तर सावळीराम बबन साबळे (४० रा. तताणी, ता. कळवण) यांचा रुग्णवाहिकेतच मृत्यू झाला. अपघातामध्ये पाच जण जखमी झाले असून त्यांना बोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते. परंतु सावळीराम साबळे व यशवंत गायकवाड यांची परिस्थिती चिंताजनक असल्याने त्यांना नाशिक जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. त्यादरम्यान साबळे यांचा मृत्यू झाला. याबाबत सुरगाणा पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद झाली असून पुढील तपास पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष गवळी, पराग गोतरणे करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...