आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवाशांसाठी सुविधा:बस महामार्गावरूनच जाणार, उड्डाणपुलावरून नेण्यास बंदी; नियम पालन न केल्यास कर्मचाऱ्यांवर कारवाई

नाशिकएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

एस.टी. महामंडळाकडून प्रवासी व उत्पन्न वाढविण्याकडे लक्ष केंद्रित करण्यात आलेले आहे. याच पार्श्वभूमीवर महामार्गावर ठिकठिकाणी एस.टी.च्या वतीने थांबे देण्यात आले आहे. या प्रवाशांना बससुविधा उपलब्ध व्हावी यासाठी मुंबई-आग्रा महामार्गावारील उड्डाणपुलावरून एस.टी. बसेस नेण्यास प्रशासनाने मनाई केली आहे. यावर देखरेखीसाठी एका विशेष पथकाची स्थापना करण्यात आली असून नियमांचे पालन न केल्यास कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार आहे.

कर्मचाऱ्यांचा संपानंतर एस.टी. महामंडळाची सेवा आता टप्याटप्याने पूर्वपदावर येऊ लागली आहे. अधिकाधिक प्रवासी वाहतुकीच्या माध्यमातून उत्पन्न मिळावे यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. प्रवाशांच्या सुविधेसाठी प्रशासनाच्या वतीने महामार्गावर ठिकठिकाणी थांबे देण्यात आलेले आहे. या थांब्यावरील प्रवासी घेऊनच पुढे मार्गक्रमण करावे अशा सूचना एस.टी. चालक व वाहकांना देण्यात आलेल्या आहेत.

मात्र, अनेकदा काही एस.टी. कर्मचारी मुंबई-आग्रा महामार्गावरील उड्डाणपुलावरूनच बस नेत असल्याने प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत होता. याबाबत थेट प्रवाशांनी प्रशासनाने याबाबत तक्रारी करत याबाबत कारवाईची मागणी केली होती. याच पार्श्वभूमीवर एस.टी. महामंडळाच्या बसेस उड्डाणपुलावर नेण्यास मनाई करण्यात आलेली आहे. याबाबत चालक व वाहकांना सूचना देण्यात आलेल्या आहेत.