आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लिलाव:गाळे लिलावाकडे व्यावसायिकांची पाठ‎

नाशिक‎17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेच्या सातपूर विभागातील‎ जप्त ७२ गाळ्यांचा शुक्रवारी जाहीर‎ करण्यात आला. मात्र या लिलाव‎ प्रक्रियेकडे व्यावसायिकांनी पाठ‎ फिरवल्याने केवळ पाचच‎ गाळ्यांचा लिलाव झाला.‎ महात्मा नगर येथील पाण्याच्या‎ टाकीजवळ असलेले व्यापारी‎ संकुल तसेच छत्रपती शिवाजी‎ महाराज व्यापारी संकुल, संत‎ शिरोमणी सावता माळी खोका‎ मार्केट, इंदिरा गांधी मार्केट सातपूर‎ कॉलनी, शिवाजीनगर मार्केट व‎ आनंदोली मार्केट मधील जप्त‎ करण्यात आलेल्या गाळ्यांचा‎ लिलाव करण्याचे मनपाने जाहीर‎ केले होते.

लिलावात भाग‎ घेण्यासाठी वीस हजार पासून‎ पन्नास हजार रुपये अनामत रक्कम‎ ठेवण्यात आली होती. एका‎ गळ्यासाठी तीन जणांचा सहभाग‎ असणे आवश्यक होते. काही गाळे‎ महिला बचतगटाकरता राखीव होते.‎ प्रत्यक्षात लिलावाच्या दिवशी केवळ‎ पाच गाळ्यांसाठी स्पर्धा झाली.‎ उर्वरित गाळ्यांसाठी संख्या पूर्ण न‎ झाल्यामुळे गाळे लिलावास‎ मुदतवाढ देण्यात आली आहे.‎

विभागीय अधिकाऱ्यांनी समजावली प्रक्रिया‎
लिलावात भाग घेण्यासाठी‎ व्यवसायिकांसह तीन वेगवेगळ्या‎ महिला गटाच्या महिलाही सहभागी‎ झाल्या होत्या. लिलाव प्रक्रियेबाबत‎ त्यांना कोणत्याही प्रकारची माहिती‎ नसल्याने विभागीय अधिकारी डॉ.‎ मयूर पाटील यांनी सर्वांना प्रक्रिया‎ समजावून सांगितली.‎

बातम्या आणखी आहेत...