आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शालीमार एक्स्प्रेसच्या आगीचे कारण गुलदस्त्यात:हलगर्जीपणाबद्दल प्रवाशांमध्ये संताप; प्रशासनाचा भोंगळपणा पुन्हा समोर

नाशिक24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक रोड रेल्वेस्थानकावर एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर शालीमार एक्सप्रेसच्या पार्सल बोगीला अचानक आग लागल्याची घटना शनिवारी (5 नोव्हेंबरला ) घडली.

शालीमार एक्स्प्रेसला अचानक आग लागल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावर निर्माण झाले आहे. या घडलेल्या घटनेनंतर प्रशासनाचा भोंगळपणाचा कारभार पुन्हा एकदा उघड झाला आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून रेल्वे विभागातील अधिकारी वेगवेगळ्या विभागाकडे बोट दाखवत आहे.

बोगीत या वस्तू आढळल्या

शालीमार एक्सप्रेसच्या पार्सल बोगीला आग लागल्यानंतर तिथे अनेक वस्तू सापडल्या आहेत. सदरील बोगीमध्ये गुटखा, कपडे, प्लॅस्टिक, लेदरचे पाकीट व ए-फोर साईज चे पेपर या वस्तू मिळाल्या आहेत.

काय आहे घटना ?

लहवीत जवळ एक्सप्रेसचे घसरलेले डबे अद्यापही पडलेले असतानाच पुन्हा शालिमार एक्सप्रेसच्या पार्सल बोगीला आग लागली आहे. यामुळे रेल्वे प्रशासनाचा हलगर्जीपणा वारंवार उघड होत असून प्रवाशांना आता रेल्वेचा प्रवास धोक्याचा वाटू लागला आहे. सुदैवाने नाशिक रोड रेल्वे स्थानक येथे गाडी उभी असल्याने हा प्रकार लक्षात आला, अन्यथा धावत्या गाडीत आग लागली असती तर विदारक चित्र पाहण्यास मिळाले असते. असे प्रवासी सांगत होते. शालिमार एक्सप्रेस शनिवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास कुर्ला रेल्वे स्थानकावर पोहोचण्याची वेळ होती, मात्र अगोदर आठ तास विलंबाने धावणारी एक्सप्रेस नाशिक रोड रेल्वे स्थानकावर बारा वाजेपर्यंत उभीच होती. त्यामुळे प्रवाशांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत होते . रेल्वे प्रशासनाच्या वतीने प्रवाशांना कोणत्याही प्रकारची सुविधा देण्यात आली नसल्याने प्रवाशांमध्ये संताप सुरू होता.

अधिकाऱ्यांचे एकमेकांवर बोट

पार्सल बोगीला आग लागल्यानंतर संबंधित विभागाच्या रेल्वे अधिकाऱ्यांना विचारले असता, त्यांनी या विभागाचा आमच्याशी संबंध नसून नेहमीप्रमाणे दुसऱ्या विभागाकडे बोट दाखविण्याचा प्रकार करीत असल्याचे दिसून आले.

विनाकारण खर्च वाढला

आम्हाला मुंबई येथे लग्नासाठी जायचे होते. त्यासाठी आम्ही सकाळी पावणेनऊ वाजताच गोदावरी एक्सप्रेस साठी आलो होतो. मात्र रेल्वेच्या ढिसाळ नियोजन मुळे आम्हाला लग्नाला जाता आले नाही. त्यामुळे आता तिकीट रद्द करून बाय रोड लग्नाला जावे लागत आहे. त्यामुळे विनाकारण खर्च वाढला- - दिव्या आकाश गोसावी, प्रवासी

सर्व नियोजन चुकले

आम्हाला मुंबईला कामानिमित्त जायचं असल्याने आम्ही सकाळी नऊ वाजताच नाशिक रोड रेल्वे स्थानकावर येऊन थांबलो मात्र सर्व रेल्वे गाड्या विलंबाने धावत असल्याने आमचे सर्व नियोजन चुकले असून वेळ आणि पैसा वाया गेला.

- करिष्मा गुंजन गायकवाड, प्रवासी.

बातम्या आणखी आहेत...